28 November 2020

News Flash

चिमुकलीच्या शस्त्रक्रियेसाठी सोनू सूदने दिला मदतीचा हात

पुन्हा एकदा सोनू सूदने गेली गरजुंची मदत

चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद करोना काळात अनेकांसाठी हिरो ठरला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून तो सातत्याने गरजुंची मदत करत आहे. सोनू सूदने अनेक गरजुंना घरे बांधण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यापर्यंत विविध मार्गाने मदत केली आहे. यामध्येच त्याने आता एका मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

सोनू सूदचं मदतकार्य पाहून अनेक जण त्याच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागत असतात. यामध्येच पीटर फर्नांडिस नामक व्यक्तीने सोनूकडे मुंबईतील एका १० वर्षीय मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे सोनूने तात्काळ या मुलीला मदत पुरवली आहे.

सोनू सूद सर मुंबईतील एका १० वर्षीय मुलीच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. ती आई-वडिलांसोबत राहत असून डॉक्टरांनी लवकरात लवकर शस्त्रक्रिया करायला सांगितली आहे, असं ट्विट पीटरने केलं होतं. त्यावर चला, या मुलीची काळजी घेऊयात. तयारीत रहा, २८ तारखेला या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असं उत्तर सोनू सूदने दिलं आहे.

दरम्यान, सोनू सूद करोनाच्या काळात अनेकांच्या मदतीसाठी धावून आला. त्याने शहरात अडकलेल्या मजुरांना सुखरूप त्यांच्या घरी पोहचवले. त्यानंतर त्याने अनेकांच्या जेवणाची सोय केली. इतकंच नाही तर विदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनादेखील त्याने सुखरुप मायदेशी परत आणल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 2:24 pm

Web Title: sonu sood will help girl child who need immediate operation for better health tweet viral dcp 98 ssj 93
Next Stories
1 केदारनाथ मंदिराचा नयनरम्य देखावा; रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओची होतेय चर्चा
2 दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सांगितल्यावर सैफच्या प्रतिक्रियेवर करीना म्हणाली; “दुर्दैवाने घरात …”
3 अष्टमीच्या निमित्ताने तेजस्विनीची मार्मिक पोस्ट
Just Now!
X