News Flash

Video : सोनू सूदला यानंतरच कंगनाने केला होता विरोध; पहिल्यांदाच समोर आला ‘तो’ सीन

कंगनासोबत झालेल्या भांडणामुळे सोनूने चित्रपटातून घेतली होती माघार

‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांशी’ हा अभिनेत्री कंगना रनौतच्या करिअरमधील एक सुपरहिट चित्रपट होता. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात सुरुवातीला अभिनेता सोनू सूद देखील झळकणार होता. परंतु कंगनासोबत झालेल्या काही अंतर्गत मतभेदांमुळे तो या चित्रपटातून तडकाफडकी बाहेर पडला. दरम्यान या चित्रपटातील एक क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सोनू जबरदस्त फाईटिंग करताना दिसत आहे.

कंगनानं ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. ‘मणिकर्णिका’मध्ये सोनू सूद देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. मात्र त्यांनं चित्रीकरण अर्ध्यावर आलं असताना माघार घेतली. “एका महिला दिग्दर्शिकेच्या हाताखाली काम करणं सोनूला जमलं नाही. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला” अशी बोचरी प्रतिक्रिया त्यानंतर कंगनानं दिली होती. तर सोनू हा ‘मणिकर्णिका’च्या चित्रीकरणासोबतचं त्यावेळी सिम्बाचं चित्रीकरणही करत होता. दोन्ही चित्रपटात सोनूचा लूक हा वेगळा होता. या दोघांमधलं संतूलन ठेवणं सोनूला अवघड होत होतं त्यामुळे त्यानं एकच चित्रपट करायचा ठरवलं अशी माहिती नंतर सोनूच्या जवळच्या व्यक्तीनं देत कंगनाचे आरोप खोडून लावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 7:31 pm

Web Title: sonu soods fighting scene from manikarnika video viral mppg 94
Next Stories
1 Sushant Suicide Case: “असत्याचा पराभव निश्चित”; अभिनेत्याचं रियाच्या वकिलांना आव्हान
2 प्रदर्शनाच्या २४ तासात साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला ‘दिल बेचारा’
3 सलमाननंतर ‘हा’ अभिनेता करतोय शेतात काम, पाहा व्हिडीओ
Just Now!
X