News Flash

सोनू सूदचा पुन्हा मदतीचा हात; ग्रामीण नवउद्योजकांचं करणार डिजिटल-आर्थिक सक्षमीकरण

‘स्पाईस मनी’शी केली भागीदारी

संग्रहित

लॉकडाउनच्या काळापासून गरजवंतांना मदतीचा हात देणाऱ्या अभिनेता सोनू सूदचं मदतकार्य अद्यापही सुरुच आहे. आता त्यानं ग्रामीण भागातील नवउद्योजकांचं डिजिटल-आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्याने ‘स्पाईस मनी’ या कंपनीशी करार केला आहे. यातून सुमारे १ कोटी नवउद्योजकांचे सक्षमीकरण केले जाणार आहे.

करोनाची साथ सुरू झाल्यापासूनच सोनी सूदने देशाच्या कानाकोपऱ्यातील गरजू व्यक्तींना मदत करण्याचे ध्येय बाळगले होते. ग्रामीण भारताची डिजिटल प्रगती व्हावी यासाठी सोनू सूदने स्पाईस मनीच्या सहकार्याने गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये नवउद्योजकतेची मानसिकता घडविण्याचे काम करण्याचे ठरवले आहे. यासाठी सोनू ‘स्पाईस मनी’मध्ये इक्विटी गुंतवणूक करून भागीदार होणार आहे, त्यामुळे या कंपनीच्या ‘अकार्यकारी सल्लागार मंडळाच्या सदस्य’पदी त्याची नियुक्ती होणार आहे.

‘स्पाइस मनी’चे संस्थापक दिलीप मोदी म्हणाले, “एक कोटीहून अधिक ग्रामीण उद्योजकांना डिजिटल आणि आर्थिक सक्षम बनवण्याची स्पाईस मनीची मोहीम आहे. आपलं घर व कुटुंबीयांना न सोडता उपजीविका करण्यास भारतीयांना आम्ही सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. याद्वारे भारताच्या प्रत्येक भागात आत्मनिर्भरता, नवउद्योजकता व आर्थिक समावेशकतेचा प्रसार करणार आहोत.’’

तर, “आम्ही एकत्रितपणे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करू. आम्हाला प्रत्येक गाव डिजिटली सक्षम बनवायचं आहे. गेल्या काही महिन्यांतील माझ्या अनुभवांच्या आधारे, मला भारतातील शहरे आणि गावांमधील लोकांच्या गरजा व त्यांची धडपड यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन लाभला. तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या देशवासीयांना सामाजिक-आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनविण्याची माझी इच्छा आहे”, असं सोनू सूदनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2020 9:28 pm

Web Title: sonu soods helping hand again trying digital economic empowerment of rural entrepreneurs aau 85
Next Stories
1 सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं १० वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची झाली कुटुंबाशी भेट
2 अमेरिकेत देण्यात आला करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
3 शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा उपोषणाला बसणार-अण्णा हजारे
Just Now!
X