News Flash

‘खून भरी मांग’ फेम अभिनेत्री सोनू वालिया यांना अश्लील फोन कॉल; पोलिसांकडे तक्रार दाखल

त्यांना काही अश्लील व्हिडिओदेखील पाठवले.

सोनू वालिया

बॉलीवूडमधील एकेकाळच्या अभिनेत्री सोनू वालिया यांनी फोनवरून त्रास देणा-या अज्ञात व्यक्तिविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बांगुर नगर पोलीस ठाण्यात कलम ३५४ आणि इतर आयटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

५३ वर्षीय अभिनेत्री सोनू वालिया यांनी शुक्रवारी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तिने सोनू यांना फोनकरून असभ्य भाषेत संवाद साधला. तसेच, त्यांना काही अश्लील व्हिडिओदेखील पाठवले. गेल्या आठवड्याभरापासून आपल्याला फोनवरून त्रास दिला जात असल्याचे सोनू यांनी पोलिसांनी सांगितले. पण, सदर प्रकरण थांबत नसल्याचे पाहून वालिया यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. सदर प्रकार थांबवण्याची तंबी देऊनही अज्ञात व्यक्तिने उलट त्यांना आणखीनच त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच, ती व्यक्ती त्यांना प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देत होती, अशी माहिती पोलीस शिरीष गायकवाड, बांगुरनगर पोलीस ठाणे यांनी दिली. रेखा आणि कबीर बेदी यांच्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात सोनू वालिया यांनी काम केले होते. या चित्रपटात कबीर बेदी यांच्या प्रेयसीची भूमिका त्यांनी साकारली होती.

भाजप नेत्या शायना एनसी यांना देखील अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. अज्ञात व्यक्तिने त्यांना फोनवर अश्लील मेसेजेस पाठविल्यासंदर्भात त्यांनी सायबरक्राइम सेल अंतर्गत गेल्याच महिन्यात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. शायना यांनी पोलिसांना सांगितले की, गेल्या डिसेंबरपासून मला अशाप्रकारचे मेसेजेस येत आहेत. पण, गेले दोन महिने मी या गोष्टीला नजरअंदाज करत आले. मात्र, फेब्रुवारीमध्ये हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्यांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. ‘अशा घटनांना सामोरं जात असलेल्या त्या लाखो महिलांसाठी मला प्रेरणा बनायचे आहे. जेणेकरून, त्या आपले मौन सोडून या हिंसेविरुद्ध लढतील,’ असे शायना एनसी म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 8:59 am

Web Title: sonu walia gets obscene calls lodges complaint at bangur nagar police
Next Stories
1 ‘दक्षिणायन’तर्फे अजेय चित्रपट मालिका
2 चित्ररंग : हाणामारीचा ‘विद्युत’घट!
3 सेटवर असा साजरा झाला टायगरचा बर्थडे
Just Now!
X