News Flash

‘इंडियाज बेस्ट डान्सर -2’ साठी डिजिटल ऑडिशन्स सुरू

ऑडिशन्स 5 मे पासून सुरू

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर’साठीचा शोध पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्या सत्रात डान्स प्रेमी आणि प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद लाभलेल्या, या वाहिनीचा स्वतःचा फॉरमॅट असलेल्या इंडियाज बेस्ट डान्सरचे दुसरे सत्र घेऊन येण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन सज्ज आहे!

इंडियाज बेस्ट डान्सरचे पहिले सत्र यशस्वी ठरले होते आणि देशातील अगदी काना-कोपर्‍यातून या मंचावर आलेल्या प्रतिभावंतांमुळे आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणामुळे हा शो उठून दिसला होता. डान्स फ्लोरवर एकमेकांना अगदी चुरशीची टक्कर देण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या प्रतिभेच्या मर्यादा पार केल्या होत्या. परीक्षकांनी या स्पर्धकांच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवले होते. या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय टेलिव्हिजनवरील हा एक अत्यंत अवघड डान्स रियालिटी शो ठरला होता. पहिल्या सत्रातच या कार्यक्रमाला निष्ठावान प्रेक्षकवर्ग लाभला होता. आणि आता हा शो परत येत आहे, उत्कृष्ट प्रतिभेचा शोध घेण्यासाठी आणि या अत्यंत अवघड अशा मंचावर त्यांना त्यांच्या ‘अल्टीमेट बेस्ट फॉर्म’ मध्ये सादर करण्यासाठी.

ऑडिशन्स 5 मे पासून

पहिल्या सत्रात प्रेक्षकांना उत्कृष्ट डान्स प्रतिभेची चुणूक दाखवल्यानंतर यावर्षी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने इंडियाज बेस्ट डान्सर सत्र 2 साठी डिजिटल ऑडिशन्सची जाहिरात केली आहे. सोनी लिव अॅपच्या माध्यमातून या ऑडिशन्स 5 मे पासून सुरू होणार आहेत. 14 ते 30 या वयोगटातील स्पर्धक नोंदणी पत्रक व्यवस्थित भरून घरबसल्या आरामात आपल्या डान्सचे दोन व्हिडिओ सोनी लिव अॅपवर अपलोड करू शकतात.

त्यामुळे, तुम्हाला जर पुढील इंडियाज बेस्ट डान्सर व्हायचे असेल, तर ते स्वप्न साकारण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल उचला!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 7:26 pm

Web Title: sony indias best dancer season 2 start from 5 may kpw 89
Next Stories
1 ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अनिता दातेची एण्ट्री
2 चित्रपटसृष्टीतील ३० हजार कामगारांना करोनाचं लसीकरण, YRF ने घेतली जबाबदारी
3 झोका घेताना तोल गेला अन्…; भारती सिंहचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
Just Now!
X