24 October 2020

News Flash

Full Tight : मैत्री, प्रेम आणि पालकत्व अशा संकल्पनांना स्पर्श करणारी मराठी वेब सीरिज

वेब सीरिजमध्ये यतीन कार्येकर आणि स्नेहा रायकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

'फुल टाइट'

मैत्री, प्रेम आणि पालकत्व अशा संकल्पनांना स्पर्श करणारी ‘फुल टाइट’ ही मराठी वेब सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एक परफेक्ट कुटुंब दिसणाऱ्या घरात आदीचे (अक्षय केळकर) त्याच्या पालकांशी (यतीन कार्येकर आणि स्नेहा रायकर) फारच विचित्र मुद्द्यांवरून वाद होत असतात. सगळं काही ठीक चाललेलं असताना, वडिल आणि मुलगा एका संध्याकाळी एकत्र दारू घेतात आणि सगळं बिघडून जातं. आयुष्यातील वेडीवाकडी वळणं, उपरोधिक गोष्टी या सगळ्यांचा पटकथेत सुरेख मेळ साधत ही वेब सीरिज साकारण्यात आली आहे.

‘सोनी लिव’वर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली असून १८ जुलै रोजी पहिला भाग प्रसारित झाला. ‘सोनी लिव’ची ही दुसरी वेब सीरिज असून ‘योलो – यू ओनली लिव वन्स’ या वेब सीरिजलाही भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

वाचा : ..म्हणून इन्स्टाग्रामने केला जॅकलिनचा सन्मान 

‘फुल टाइट’ या सात भागांच्या वास्तवदर्शी मालिकेचे दिग्दर्शन श्रीपाद पवारने केलं आहे तर विजय बारसे यांनी निर्मिती केली आहे. या वेब सीरीजमध्ये यतीन कार्येकर आणि स्नेहा रायकर यासारखे लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांच्याबरोबर अक्षय केळकर, सायली साळुंखे, वनश्री जोशी आणि सुमुखी पेंडसे आदी कलाकारही भूमिका साकारत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 3:54 pm

Web Title: sony liv full tight marathi web series on friendship love and parenthood
Next Stories
1 कॅन्सरविषयी मुलाला सांगावं तरी कसं, सोनालीपुढे होता पेच
2 ..म्हणून इन्स्टाग्रामने केला जॅकलिनचा सन्मान
3 ‘धडक’पूर्वीच प्रदर्शित झाले ‘सैराट’चे चार रिमेक
Just Now!
X