30 November 2020

News Flash

केबीसी प्ले अलाँग : दररोज १० विजेते, १० लाख रूपयांचे बक्षीस

सोनी लिवने 'केबीसी प्‍ले अलाँग'अंतर्गत 'हर दिन १० लखपती'ची ऑफर सुरू केली आहे.

सोनी लिवने ‘केबीसी प्‍ले अलाँग’अंतर्गत ‘हर दिन १० लखपती’ची ऑफर सुरू केली आहे. यामध्ये भारतातील १० विजेत्‍यांना दररोज १ लाख रूपये जिंकण्‍याची संधी मिळणार आहे. यंदा हा खेळ टीम्समध्येही खेळता येऊ शकेल. यासह युजर्स त्‍यांचे मित्र व कुटुंबातील सदस्‍यांसोबत स्‍वत:च्‍या टीम्‍स तयार करू शकतात. टीमचा स्‍कोअर हा वैयक्तिक खेळाडूचा स्‍कोअर मिळून असेल. सर्वाधिक स्‍कोअर करणा-या टीमला दररोज १ लाख रूपयांचे रोख बक्षीस मिळेल. यामध्‍ये रेफरल्‍सची संधी देखील आहे. युजर अतिरिक्‍त पॉइण्‍ट्स जिंकण्‍यासाठी मित्र व कुटुंबातील सदस्‍यांना आमंत्रित करू शकतो/ संदर्भ देऊ शकतो आणि ते स्‍वत:साठी सोनी लिवचे मोफत सबस्क्रिप्‍शन मिळवू शकतात.

या स्‍पर्धेमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत अनेक बक्षीसे जसे कार, टेलिव्हिजन सेट, मोबाइल फोन्‍स, ब्‍ल्‍यूटूथ स्पीकर्ससोबत विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स व गिफ्ट कार्ड युजर्स जिंकू शकतात. यंदाचा केबीसीचा सिझन २८ सप्टेंबरपासून सुरू झाला असून रात्री ९ वाजता प्रसारित होतो.

याविषयी डिजिटल व्यवसायाचे अमन श्रीवास्‍तव म्हणाले, ”सोनी लिववर पहिल्‍यांदाच ऑडिशन्‍ससह ऑनलाइन भरघोस प्रतिसाद मिळण्‍यापर्यंत कौन बनेगा करोडपतीसाठी हे नाविन्‍यपूर्ण वर्ष राहिले आहे. दररोज दहा जणांना एक लाख रुपये सहज जिंकता येईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 6:35 pm

Web Title: sony liv kbc play along everyday 10 winners can get exciting prizes ssv 92
Next Stories
1 प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’च्या शूटिंगला होणार सुरूवात
2 निर्मात्यांसोबत भांडण झाल्याने जुन्या अजंली भाभीने सोडली मालिका?
3 ‘अग्गंबाई सासूबाई’ : निवेदिता सराफ यांना करोना झाल्याने मालिकेत केला ‘हा’ बदल
Just Now!
X