News Flash

‘गाथा नवनाथांची’ नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

२१ जून पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

gatha navnathanchi, new marathi serial,
लवकरच येणार नवनाथांवर मालिका

महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका आजपर्यंत आलेली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका २१ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा या मालिकेतून प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना नाही, त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं हे आव्हानात्मक असणार आहे. काही प्रसंग दाखवण्यासाठी साठी विएफएक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत विएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात गेला जातो. त्यामुळे या मालिकेतील विएफएक्स हा एक महत्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे. २१ जून पासून ही मालिका सोनी मराठीवर संध्याकाळी ६:३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 6:20 pm

Web Title: sony marathi new serial gatha navnathanchi avb 95
Next Stories
1 “सकाळची लाळ त्वचेसाठी गुणकारी”; अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या चाहत्यांना टिप्स
2 करिश्माच्या पतीची दुसरी पत्नी आहे हॉट, करिश्माला जळवण्यासाठी केलं हे काम…
3 सैफ अली खान वयाच्या ५०व्या वर्षी चौथ्यांदा बाबा झाल्यावर सारा अली खान म्हणाली..