विनोद हा मनोरंजनाचा अविभाज्य भाग आहे. नऊ रसांपैकी एक महत्त्वाचा रस म्हणजे ‘हास्यरस’! इंग्रजीत एक म्हण आहे ‘लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन’ आणि म्हणूनच प्रत्येकानं हासतं राहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्या हसण्याची जबाबदारी गेली अनेक दशकं मनोरंजन सृष्टी घेत आहे. या अनेक दशकांमध्ये विनोदाची परिभाषा बदलली आहे. अनेक विनोदवीरांचा त्यात मोलाचा वाटा आहे. चार्ली चॅप्लिननं जगाला दाखवलेला मूक विनोद असो किंवा दादा कोंडकेंचे धमाल विनोद! पुढच्या काळात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीनं आपल्या अफलातून अभिनयानं विनोदाची परिभाषा बदलून संवादशैली आणि देहबोली यांच्या मदतीनं विनोद कसा खुलवता येतो हे दाखवलं. मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव यांनीही विनोदाचं नवीन अंग प्रेक्षकांना दाखवलं. या सगळ्यांत विनोदात बदल होत गेले आणि विनोदाचे अनेक पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.
सोनी मराठी वाहिनी असाच एक विनोदानं परिपूर्ण कार्यक्रम घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे ‘लाफ्टर स्टार’! या कार्यक्रमाची खासियत अशी की यामध्ये सामान्य माणसाला आपली कला सादर करता येणार आहे. प्रसिद्धी मिळवण्याची संधी यामुळे अनेक होतकरूंना मिळणार आहे. यासाठी स्पर्धकांना आपला एक मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोनी लिव्ह या अॅपद्वारे पाठवावे लागणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 5:49 pm