News Flash

‘श्रीमंताघरची सून’ मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा

अनन्याची लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे

वटपौर्णिमा विशेष भाग हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहेत.

वटपौर्णिमा हा सुवासिनींसाठी अगदी खास सण, येत्या काही भागांमध्ये सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘आई माझी काळुबाई’ आणि ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकांमध्ये प्रेक्षकांना वटपौर्णिमा पाहायला मिळणार आहे.

अनन्याची लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे आणि अनन्याबरोबर अथर्वही तिच्यासाठी वडाला फेऱ्या घालून वटपौर्णिमेची पूजा करतो. पुढचे ७ जन्म हीच बायको मिळावी अशी इच्छा व्यक्त करतो. पण ‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेत मात्र याच जन्मात आपण एक होणार नाही, तर पुढल्या जन्मांसाठी पूजा का करायची, असं म्हणून सूर्यभान ऐश्वर्याला वटपौर्णिमा करण्यास साफ नकार देतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

‘आई माझी काळुबाई’ मालिकेत अमोघचे प्राण संकटात असून आर्या आपल्या पतीचे प्राण सावित्रीप्रमाणेच वाचवू शकेल का, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वटपौर्णिमा विशेष भाग हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 5:21 pm

Web Title: sony marathi serial vat pournima special episode avb 95
Next Stories
1 खाकी वर्दीत संजूची वटपौर्णिमा; रणजीतची मिळाली साथ
2 मैत्री पलीकडच्या नात्याची गोष्ट; ३० जूनला झळकणार ‘जून’ सिनेमा
3 ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ना मिळणार छोट्या वादकांची साथ
Just Now!
X