News Flash

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत होणार डॉ. अमोल कोल्हेंची एण्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

जाणून घ्या, कधी पाहता येणार हा भाग

छोट्या पडद्यावर प्रचंड गाजत असलेली मालिका म्हणजे ‘स्वराज्यजननी जिजामाता’. या मालिकेमध्ये आतापर्यंत अनेक नवनवीन गोष्टींचा उलगडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच जिजामातांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण टप्पेदेखील या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले गेले. त्यातच आता या मालिकेत लवकरच डॉ. अमोल कोल्हे यांची एण्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे या नव्या भागात ते एका खास भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे याच दरम्यान डॉ. अमोल कोल्हे या मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेत ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हेंची भूमिका असलेला हा भाग २ आणि ३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे नेमकी कोणती भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांची लक्ष वेधलं असून त्यांची उत्सुकता वाढल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 2:23 pm

Web Title: sony marathi swarajya janani jijamata special episode dr amol kolhe ssj 93
Next Stories
1 विद्या बालनं ट्रोलर्सवर भडकली; रियावर टीका करणाऱ्यांना केला सवाल
2 “हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना”; सिद्धार्थनं केलं मदतीचं आवाहन
3 मोदी-निर्मित संकटं दाखवणाऱ्या राहुल गांधींना बॉलिवूड दिग्दर्शकाचा टोला; म्हणाले…
Just Now!
X