News Flash

‘या क्षेत्रातील प्रत्येक बाबीवर माझं प्रेम’

झायेद खानचं तो भरभरून कौतुक करत असतो

सवंत सिंग प्रेमी सध्या सोनी टीव्हीच्या ‘हासिल’ या मालिकेत दिसतोय. या मालिकेतील सहकलाकार झायेद खानचं तो सध्या भरभरून कौतुक करत असतो. झायेद आणि सवंत ‘हासिल’ मालिकेत भावांची भूमिका साकारत आहेत.

झायेदबद्दल बोलताना सवंत म्हणाला की, ‘संपूर्ण मालिकेत तुम्हाला पाठिंबा देणारा, अगदी मनापासून तुमच्यासोबत असणारा सहकलाकार मिळणं, हे खरंच फार छान असतं. आमची अगदी पहिल्या दिवसापासूनच गट्टी जमली आणि आम्ही बराच वेळ आमच्या आधीच्या कामाबद्दल बोलत होतो. त्याच्यासोबतचा रोजचा दिवस कॅमेर्‍यासमोर आणि कॅमेर्‍यामागेही बरंच काही शिकवणारा असतो.’

गेली ४ वर्षे मनोरंजनाच्या दुनियेत असलेला सवंत नेहमीच झगमगाटापासून दूर राहिला आहे. त्याने झी टीव्हीच्या ‘जमाई राजा’ चॅनल व्हीच्या ‘क्रेझी स्टुपिड इश्क’ या मालितांमध्ये आणि २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्हशुदा’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

‘हासिल’ मालिकेबद्दल बोलताना सवंत म्हणाला की, ‘या मालिकेत काम करण्याचा एक वेगळा अनुभव होता. ही ठराविक भागांची मालिका होती. त्यामुळे काम सुरू होण्याआधी बरंच प्लॅनिंग आणि तयारी झाली होती. त्याची फारच मदत झाली. मी हॉलिवूड शॉर्ट सिरिजचा चाहता आहे. भारतातही अशा सिरिजचा मी भाग होऊ शकलो, याचा मला आनंद आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 9:37 pm

Web Title: sony tv serial haasil star zayed khan savant singh premi
Next Stories
1 वादविवादांमुळे माझेच नुकसान झाले- कंगना रणौत
2 Aiyaary Trailer: सिद्धार्थ- मनोजची दमदार ‘अय्यारी’
3 मराठी चित्रपटांना प्राइम टाइम द्या- शालिनी ठाकरे
Just Now!
X