21 January 2021

News Flash

“काही लोक स्वत:ला शेरलॉक होम्स समजतात”; आणखी एका अभिनेत्रीचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा

रिया चक्रवर्तीसह दोघांना अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान सोशल मीडियाद्वारे रियावर सध्या जोरदार टीका होत आहे. मात्र ही टीका अभिनेत्री सोन्या अयोध्या हिला आवडलेली नाही. तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का? असा सवाल तिने टीकाकारांना केला आहे.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सोन्या अयोध्या हिने सुशांत मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “अनेक जण पुराव्यांअभावी रिया चक्रवर्तीवर टीका करत आहेत. खरं तर सुशांतच्या मृत्यूपूर्वीच रियाने त्याचा फ्लॅट सोडला होता. या प्रकरणात जर रिया दोषी असेल तर तिला शिक्षा होईलच, पण खरी माहिती समोर येईलपर्यंत उगाचच तिच्याविरोधात अफवा पसरवू नये. या प्रकरणात काही लोक स्वत:ला जणू शेरलॉक होम्स समजत आहेत. त्यांनी सीबीआयला आपली चौकशी करु द्यावी” असं म्हणत तिने रियाला पाठिंबा दिला. यापूर्वी तापसी पन्नू, विद्या बालन, मिनिशा लांबा, स्वरा भास्कर, हिना खान अशा अनेक अभिनेत्रींनी रियाला पाठिंबा दिला होता.

रिया चक्रवर्तीसह दोघांना अटक

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयीत आरोपी रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अटक केली आहे. अंमली पदार्थ खरेदी व सेवन करण्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. रिया चक्रवर्ती ही कुटुंबातील ही दुसरी अटक आहे. या घडामोडीमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 4:11 pm

Web Title: sonyaa ayodhya defends rhea chakraborty sushant singh rajput death case mppg 94
Next Stories
1 अक्षयची पत्नी मोठी स्टार का नाही? ट्विंकलने मीम्स शेअर करत सांगितलं कारण
2 झी टॉकीजचा विशेष चित्रपट महोत्सव
3 …म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात काळजी करत नाहीत; चेतन भगत यांनी सांगितली तीन कारणं
Just Now!
X