जिया खान प्रकरणात आरोपी असलेल्या सूरज पांचोलीने या खटल्याचा मानसिक त्रास होत असल्याचा खुलासा केला आहे. “या घटनेमुळे माझं करिअर उद्ध्वस्त होत असून, जिया खान आत्महत्या प्रकरणाविषयी बोलताना अभिनेता सूरज पांचोली याला भावना अनावर झाल्या. “काहीही केलेलं नसताना मला तुरूंगात जावं लागल. वयाच्या २१व्या वर्षी मी तुरूंगवास भोगला आणि करिअर उद्ध्वस्त झालं” असं नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान सुरज म्हणला.

अभिनेत्री जिया खान सुरज पांचोलीची खास मैत्रीण होती. २०१३ साली तिने आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सुरज पांचोलीवर आहे. “जिया खान मृत्यृ प्रकरणाशी माझा काडीचाही संबंध नाही. तिच्या कुटुंबीयांनी माझ्यावर केलेले सगळे आरोप तथ्यहीन आहेत. आता मी न्यायव्यस्थेकडून मिळणाऱ्या निकालाची १४ वर्षे वाट पाहू शकत नाही. आजवर माझ्यावर होणारा अन्याय मी शांतपणे करत आलो आहे. कारण माझा देशातील न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.” अशा शब्दात सुरज पांचोलीने जिया खान प्रकरणावर आपली प्रतिक्रीया दिली.

जिया खानने आत्महत्या करण्यापूर्वी सुरजला एक पत्र लिहिले होते. या पत्राच्या आधारावर त्याने जिया खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे आरोप ठेवण्यात आले.

काय होते हे पत्र

इंग्रजीत लिहिलेल्या या सहा पानी पत्रात जियाने आपले आयुष्य सूरजने कसे उद्ध्वस्त केले ते तपशीलवार लिहिले आहे. या पत्राचा आशय थोडक्यात असा-

मी तुला प्रेम दिले पण तू माझी फसवणूकच करत गेलास. तुझ्यामुळे मला सतत गर्भवती राहण्याची भीती वाटायची. तुझ्यामुळेच मी गर्भपात केला होता. मी आतून कोलमडले होते. तू सतत माझ्यावर बलात्कार करत राहिलास. तू भेटण्यापूर्वी मी महत्त्वाकांक्षी होते. तुझ्या प्रेमात माझे करियरही उद्ध्वस्त झाले. मी फक्त तुझा विचार करत होते. तू नेहमी इतर मुलींमध्ये राहिलास आणि माझी फसवणूक करत गेलास. माझ्या आयुष्यातला प्रकाश तू हिरावून घेतलास. नशिबाने आपल्याला का भेटवलं, असा मला वाटतंय. तू प्रत्येक दिवस माझा छळ करत राहिलास. तुझ्यामुळे माझा कोंडमारा झाला आणि मी उद्ध्वस्त होत गेले. हे पत्र जेव्हा तू वाचशील तेव्हा मी या जगात नसेन. माझ्या प्रेमाची तू अहवेलना केलीस पण माझ्याएवढे प्रेम तुझ्यावर कुणी करणार नाही.