गेल्या अनेक दिवसांपासून देशातील करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा अशा अनेक कलाकारांना करोनाचा संसर्ग झाला होता. आता अभिनेता सुरज पंचोलीची आई झरीन वहाब यांना देखील करोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

इटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यामध्ये झरीन वहाब यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवसांपूर्वी त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. तेथे त्यांना करोना झाल्याचे कळाले. त्यांच्या कुटुंबीयांनी या बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zarina Wahab (@zarinawahab123) on

इटाइम्सने झरीन वहाब यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांशी संवाद साधला. ‘झरीन यांना अंगदुखी, ताप आणि सांधेदुखी होती. तसेच जेव्हा त्या रुग्णालयात आल्या तेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती’ असे डॉक्टरांनी म्हटले. आता त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाली असून त्या घरी आयसोलेशनमध्ये आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

चोवीस तासांत देशात ७५,०८३ रुग्णांची नोंद

देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ५५ लाखांचा टप्पादेखील ओलांडला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ७५ हजार ८३ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या ५५ लाख ६२ हजार ६६४ वर पोहचली आहे. देशात एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीदेखील दुसरीकडे करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल आहे. आरोग्य मंत्रालयनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.