News Flash

पुन्हा भेटू! सूरज पांचोलीनं घेतली इन्स्टाग्रामवरुन एक्झिट

...म्हणून सूरज पांचोलीने केलं इन्स्टाग्रामला रामराम

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सलियन यांच्या आत्महत्येनंतर अभिनेता सूरज पांचोली सतत चर्चेत आहे. त्याचं आणि दिशाचं अफेअर होतं असं म्हणत अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच सूरजने सोशल मीडियापासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केलं आहे. इतकंच नाही तर त्याने सगळ्या पोस्टदेखील डिलीट केल्या आहेत.

सूरजने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत इन्स्टाग्राम सोडत असल्याचं सांगितलं. “पुन्हा भेटू इन्स्टाग्राम. आशा आहे ज्या दिवशी या जगात चांगली जागा निर्माण होईल तेव्हा पुन्हा आपली भेट होईल”, अशी पोस्ट सूरजने शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट वाचून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ट्रोलिंगला कंटाळून त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून सूरज सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दिशा आणि त्याचं अफेअर होतं अशी चर्चा होती. परंतु, मी दिशाला ओळखत नसल्याचं त्याने अनेकदा सांगितलं होतं. इतकंच नाही तर सुशांत आणि त्याचं भांडण झाल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, सूरजने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 1:19 pm

Web Title: sooraj pancholi quits instagram says hopefully will see again ssj 93
Next Stories
1 अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर वादग्रस्त टिप्पणी; औरंगाबादमधून २७ वर्षीय तरुणाला अटक
2 महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत घोटाळा केल्याप्रकरणी अभिनेत्रीला तुरुंगवास
3 “कदाचित आयुष्यभर मी एकटीच राहिन”; रिया चक्रवर्तीचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल…
Just Now!
X