News Flash

Video : भरधाव वेगात बाईक चालविणाऱ्या रोहित शेट्टीचा व्हिडिओ पाहिलात का ?

त्याने फाईट मास्टर वीरु देवगण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी,ड्रामा या साऱ्या गोष्टींची एकत्र मेजवाणी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे चित्रपट. ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’, ‘सिम्बा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीस गाजवलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शेट्टी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘सूर्यवंशी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहितच्या अन्य चित्रपटांप्रमाणेच त्याच्या या चित्रपटामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून यामधील रोहितचा अॅक्शन सीन मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे खुद्द रोहितने सेटवरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्या या चित्रपटाचं बॅकॉकमध्ये चित्रीकरण सुरु आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यापैकी एका व्हिडिओमध्ये रोहित जेम्स बॉण्डप्रमाणे भरधाव वेगामध्ये बाईक चालविताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एका कार हवेत उंचावरुन जमिनीवर आदळताना दिसत आहे.


रोहितने शेअर केलेल्या व्हिडिओपैकी पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने फाईट मास्टर वीरु देवगण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या व्हिडओत रोहित भरधाव वेगामध्ये बाईक चालवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘माझे गुरु, माझे वडील वीरु देवगण यांना माझ्यावर कायम गर्व होता’.

 

View this post on Instagram

 

Just another day at work!!!#sooryavanshi

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty) on

दरम्यान, रोहितच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असून या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि कतरिना कैफ तब्बल ९ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 10:42 am

Web Title: sooryavanshi director rohit shetty dangerous bike stunt video
Next Stories
1 …अन् सलमानसाठी वडिलांनी भोगली उन्हात उभं राहण्याची शिक्षा
2 वीरु देवगण यांना पंतप्रधान मोदींकडून आदरांजली
3 …म्हणून सुनील ग्रोवरने कपिल शर्मा शोमध्ये येणं टाळलं
Just Now!
X