News Flash

या बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तानला म्हटले ‘आझादी मुबारक’, मिका सिंग भडकला

आझादी मुबारक पाकिस्तान.. दहशतवाद आणि भ्रष्टाचार यातून तुमची सुटका होवो यासाठी शुभेच्छा.

सोफी चौधरी

भारतात उद्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येईल. पण, त्या आधी पाकिस्तानमध्ये १४ ऑगस्ट हा दिवस निर्मिती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल सोफी चौधरी हिने सोशल मीडियावरून पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोफी चौधरीने ट्विट केलेय की, ‘आझादी मुबारक पाकिस्तान.. दहशतवाद आणि भ्रष्टाचार यातून तुमची सुटका होवो यासाठी शुभेच्छा. आपल्यात दुरावा निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांना थांबवण्यात येत्या काळात आपल्याला यश मिळेल अशी मी आशा करते.’ सोफीच्या या ट्विटला गायक मिका सिंगने ट्विट करत त्याचा राग व्यक्त केला आहे. पाकिस्तानला शुभेच्छा देणाऱ्या सोफीला आता नेटीझन्सनी जाब विचारावा यासाठी मिकाने तिचे ट्विट रिट्विट केले. त्याचसोबत त्याने लिहिलंय की, ‘सर्वांनी लक्ष देऊन ऐका माझी प्रिय मैत्रिण काय म्हणतेय… माझ्याकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला बराच वेळ आहे ना आता सोफी चौधरीचे ट्विट वाचा.’ या ट्विटमध्ये त्याने सोफीचे ट्विटर हॅण्डल मेन्शन केलेय. एका अर्थी मिकाने काही दिवसांपूर्वी त्याची निंदा करणाऱ्या लोकांना डिवचण्याचाच प्रयत्न केल्याचे त्याच्या ट्विटवरून दिसतेय.

वाचा : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर आलेल्या सलमानचे अशाप्रकारे वाचले प्राण

बॉलिवूड गायक मिका सिंग काही दिवसांपूर्वी अमेरिकेत झालेल्या हमारा पाकिस्तान कॉन्सर्टवरून वादात अडकला होता. मिकाने एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलेला. त्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना, ‘चला भारत आणि ‘आपल्या पाकिस्तान’चा स्वातंत्र्य दिवस एकत्र साजरा करूया’, असे म्हणताना दिसला होता. त्याच्या या वक्तव्यावरून अनेकांनी तेव्हा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आणि ट्रोलही केलेले. अनेक ट्विटरकरांनी त्याला कडक शब्दांत सुनावले होते. तर चित्रपट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मिकाला महाराष्ट्रात आता माईकही धरु देणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. हाच राग मनात धरून मिकाने आता सोफीवर निशाणा साधल्याचे दिसते.

वाचा : ‘शक्तिमान’मधील ‘किलविश’ दिसते; सोशल मीडियावर मंदिराची खिल्ली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 11:51 am

Web Title: sophie chaudhary wished pakistan on their independence day mika singh trying to troll her
Next Stories
1 भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर आलेल्या सलमानचे अशाप्रकारे वाचले प्राण
2 .. म्हणून राणा डग्गुबतीचा आनंद गगनात मावेना
3 सिनेनॉलेज : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला हिंदी चित्रपट कोणता?
Just Now!
X