News Flash

सोफी टर्नरने पहिल्यांदाच पोस्ट केले गरोदरपणातील फोटो

पाहा, सोफी टर्नरने शेअर केलेले गरोदरपणातील काही खास फोटो

हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर हिने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोफी टर्नर आणि जो जोनास यांना मुलगी झाली आहे. त्यानंतर आता सोफीने तिच्या प्रेग्नंसी काळातले जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोफीच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

सोफीने पहिल्यांदाच तिच्या प्रेग्नंसी काळातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोफी तिच्या बेबीबंपसोबत दिसून येत आहे. सोफीने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी तिने प्रेग्नंसी काळातील कोणताच फोटो शेअर केला नव्हता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sophie Turner (@sophiet) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Sophie Turner (@sophiet) on


दरम्यान, २२ जुलै रोजी लॉस एंजलीसमधील एका रुग्णालयात सोफीने चिमुकल्या मुलीला जन्म दिला. सोफी आणि जो यांच्या मुलीचं नाव त्यांनी Willa असं ठेवलं आहे. सोफी आणि जो यांनी २०१७ मध्ये पॅरिस येथे मोठ्या थाटात लग्न केलं. सोफी आणि प्रियांका एकमेकींच्या जावा असूनदेखील त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा या दोघी एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 3:25 pm

Web Title: sophie turner shares her pregnancy pictures see here ssj 93
Next Stories
1 महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल
2 सुशांतपाठोपाठ आता रिया चक्रवर्तीच्या जीवनावर येणार चित्रपट?
3 जॅकलीननं निळ्या साडीत धरला ताल अन् पाहता पाहता ‘गेंदा फूल’ झालं हिट
Just Now!
X