06 December 2019

News Flash

रजनीकांत यांची कन्या अडकली विवाहबंधनात

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार या लग्नाला उपस्थित होते.

चेन्नईत पार पडला विवाहसोहळा

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या हिने व्यावसायिक आणि अभिनेता विशगन वनानगामुडी याच्याशी सोमवारी लग्नगाठ बांधली. चेन्नईतल्या ‘द लीला पॅलेस’ हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची जंगी तयारी सुरू होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार या लग्नाला उपस्थित होते.

सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका आहे. सौंदर्या आणि विशगन दोघंही घटस्फोटीत आहेत. २०१० मध्ये सौंदर्यानं चेन्नईस्थित व्यावसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केलं होतं मात्र या दोघांच्या वैवाहिक जीवनात वारंवार खटके उडत असल्यानं २०१७ मध्ये तिनं घटस्फोट घेतला. रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. अखेर दोघांनीही कायदेशीर घटस्फोट घेतला. मी माझ्या पतीपासून विभक्त झालेय, असे यानंतर सौंदर्याने ट्विटरवर जाहीर केले होते. तर मॅगझिन एडिटर कनिका कुमारनसोबत विशगन याचे पहिले लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. कनिकाने निर्माता वरूण मनियनसोबत दुसरे लग्न केले आणि विशगननेही सौंदयार्सोबत लग्नगाठ बांधली.

Soundarya Rajinikanth

सौंदर्यानं अभिनयापेक्षा पडद्यामागे राहत या क्षेत्राशी आपली नाळ जोडली. तिनं दिग्दर्शनात अधिक रस घेतला. सौंदर्यानं काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे. तर विशगन एका आघाडीच्या कंपनीचा कार्यकारी संचालक आहे. इंग्लडमध्ये विशगन यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. विशागन ‘वंजागर उल्लघम’ या चित्रपटात काम केलं आहे.

 

First Published on February 11, 2019 1:33 pm

Web Title: soundarya rajinikanth and vishagan vanangamudi tied knot in chennai
Just Now!
X