20 October 2019

News Flash

दुसऱ्या लग्नाबाबत रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने केला ‘हा’ खुलासा

सौंदर्या-विशागनच्या लग्नाला नुकतेच ३ महिने पूर्ण झाले आहेत

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीने सौंदर्याने ११ फेब्रुवारी रोजी व्यावसायिक आणि अभिनेता विशागन वनानगामुडी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. सौंदर्याचं हे दुसरं लग्न असून या विवाहसोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. सौंदर्या-विशागनच्या लग्नाला नुकतेच ३ महिने पूर्ण झाले असून सौंदर्याने लग्नानंतर पहिल्यांदाच लग्नातील काही किस्से शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या लग्नामध्ये तिचा मुलगा वेद जवळ नसल्यामुळे ती नर्व्हस होती हेदेखील तिने सांगितलं.

“लग्नाचे विधी सुरु असताना सारे जण आनंदामध्ये होते. या आनंदाच्या क्षणात माझा मुलगा वेद माझ्या जवळ असावा असं मला सतत वाटत होतं. मात्र तो जवळ नसल्यामुळे विधींच्यावेळी मी प्रचंड नर्व्हस होते. परंतु केवळ माझ्या एका हास्यासाठी विशागनने जे केलं ते मी कधीच विसरणार नाही. माझ्या नाराजीचं कारण समजल्यानंतर जोपर्यंत वेद लग्नमंडपात येत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही अशी अट विशागनने घातली. त्याच्या या अटीनंतर वेद मंडपात आला आणि आमचं लग्न नीट पार पडलं”, असं सौंदर्याने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “आमचं लग्न वेदने पहावं असं मला आणि विशागनला वाटत होतं. विशेष म्हणजे विशागनने माझ्याशी लग्न करण्यासाठी वेदकडून परवानगीही घेतली होती”.

दरम्यान, २०१० मध्ये सौंदयाने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर या दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि या वादाच रुपांतर घटस्फोटोमध्ये झालं. रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. अखेर दोघांनीही कायदेशीर घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सौंदर्यानी ही माहिती ट्विटरवर शेअर केली. सौंदर्याचे हे दुसरे लग्न आहे. सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका आहे. विशगन हा सुद्धा घटस्फोटित आहेत. मॅगझिन एडिटर कनिका कुमारनसोबत त्याचे पहिले लग्न झाले होते. होता.

 

First Published on April 18, 2019 12:34 pm

Web Title: soundarya rajinikanth vishagan refused to tie the knot till my son ved came to the mandap