News Flash

सौंदर्या रजनीकांत दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात, पहा सोहळ्यातले खास फोटो

सौंदर्यानं सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या ११ फेब्रुवारी रोजी व्यावसायिक आणि अभिनेता विशगन वनानगामुडी याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची जोरदार तयारी रजनीकांत यांच्या घरी सुरू आहे. या आठवडाभरात अनेक कार्यक्रम आणि विधी पार पडल्या. या कार्यक्रमासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेकांनी उपस्थिती लावली.

चैन्नईमधल्या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. सौंदर्यानं लग्नाच्या एक दिवसआधी तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम तीन व्यक्तींची ओळख करून दिली. पिता रजनीकांत , मुलगा आणि पती विशगन या तीन सर्वोत्तम व्यक्ती आहेत असं म्हणत तिनं या तिघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

सौंदर्या आणि विशगन दोघंही घटस्फोटीत आहे. २०१० मध्ये सौंदर्यानं चेन्नईस्थित व्यावसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केलं होतं मात्र या दोघांच्या वैवाहिक जीवनात वारंवार खटके उडत असल्यानं २०१७ मध्ये तिनं घटस्फोट घेतला. तिचा संसार टिकवण्यासाठी रजनीकांत यांनी अनेकदा मध्यस्थी केली मात्र ते अपयशी ठरले.

सौंदर्यानं अभिनयापेक्षा पडद्यामागे राहत या क्षेत्राशी आपली नाळ जोडली. तिनं दिग्दर्शनात अधिक रस घेतला. सौंदर्यानं काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.

तर विशगन एका आघाडीच्या कंपनीचा कार्यकारी संचालक आहे. इंग्लडमध्ये विशगन यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. विशागन ‘वंजागर उल्लघम’ या चित्रपटात काम केलं आहे. विशागननं २०१७ मध्ये पत्नीशी घटस्फोट घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 3:24 pm

Web Title: soundarya rajinikanth wedding celebration photos
Next Stories
1 … म्हणून हिमांशसोबत केलं ब्रेकअप, अखेर नेहानं सोडलं मौन
2 तनुश्रीला हार्वर्ड विद्यापीठाकडून खास आमंत्रण
3 Video : ‘माय नेम इज रागा’, मोदींनंतर आता राहुल गांधींवरही चित्रपट
Just Now!
X