News Flash

“माझ्या बायोपिकमध्ये भूमिका साकारायची असेल तर..”; सौरव गांगुलीचा हृतिकला सल्ला

नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये सौरवने व्यक्त केली इच्छा

सौरव गांगुली, हृतिक रोशन

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने त्याच्या बायोपिकमध्ये हृतिक रोशनने त्याची भूमिका साकारावी अशी इच्छा व्यक्त केली. पण जर हृतिकला ती भूमिका साकारायची असेल तर सौरव गांगुलीने त्याला एक सल्ला दिला आहे. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सौरव गांगुलीने हजेरी लावली होती. या शोमध्ये नेहाने बायोपिकविषयी त्याला प्रश्न विचारला.

तुझी भूमिका अत्यंत चपखलपणे कोण साकारू शकतो असं तुला वाटतं, असा प्रश्न नेहाने त्याला विचारला. त्यावर हृतिक रोशन उत्तमरित्या साकारू शकेल असं उत्तर त्याने दिलं. सोबतच भूमिका साकारण्यासाठी एक सल्लासुद्धा सौरव गांगुलीने यावेळी दिला. “अनेकांना हृतिकसारखी शरीरयष्टी पाहिजे असते. मात्र माझी भूमिका साकारण्यासाठी हृतिकला माझ्यासारखी शरीरयष्टी बनवावी लागेल”, असं तो म्हणाला.

आणखी वाचा : उर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पॉर्न स्टार- कंगना रणौत

“हृतिक माझा आवडता अभिनेता आहे. ज्यावेळी सुपर 30 चित्रपटात हृतिकला आनंद कुमार यांच्या भूमिकेसाठी निवडलं त्यावेळी अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र हृतिकने ती भूमिका लिलया पेलली. हृतिक हा एकमेव असा अभिनेता होता जो आनंद कुमार यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकत होता,” अशा शब्दांत सौरव यांनी याआधीही हृतिकची स्तुती केली होती. त्यामुळे आता सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 1:57 pm

Web Title: sourav ganguly has hilarious advice for hrithik roshan if he wants to feature in his biopic ssv 92
Next Stories
1 अभिनेत्रीचा योगा पाहून अनुराग कश्यप चक्रावला; म्हणाला…
2 ‘आत्मनिर्भर भारता’चा उल्लेख करत फराह खानने मोदींना दिल्या शुभेच्छा
3 अभिनेत्री राजेश्वरी सचदेव करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X