News Flash

अभिमानास्पद! करोना रुग्णांच्या मदतीसाठी सुपरस्टार बनला रुग्णवाहिका चालक

तो लोकांच्या मदतीला धावून आला आहे.

(Photo Credit: Arjun Gowd instagram)

सध्या करोनाच्या संकटामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि त्यातच आरोग्य सुविंधावर पडणारा ताण यामुळे देशात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार लोकांना मास्क लावा, सॅनिटायझर वापरा आणि योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. अभिनेता सोनू सूदसोबतच अनेक कलाकारांनी आर्थिक मदत देखील केली आहे. दरम्यान एक अभिनेता करोना रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका चलक बनला आहे.

कन्नड सुपरस्टार अर्जुन गौड लोकांच्या मदतीला धावून आला आहे. तो करोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका चालकाचे काम करत आहे. करोना झालेल्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे, मृत्यूमूखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्याचे काम तो करत आहे.

Indian Idol 12: सायली कांबळेचे वडील करोना रुग्णांसाठी चालवतात रुग्णवाहिका

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Gowda (@actor_arjungowda_92)

आणखी वाचा : ‘तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…’, हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

याबाबत बोलताना अर्जुन म्हणाला, ‘गेल्या काही दिवसांमध्ये मी अनेक करोना संक्रमित लोकांवर अंत्यसंस्कार केले. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना वेळेवर मदत मिळावी हिच माझी इच्छा आहे. तो व्यक्ती कुठून आला आहे, त्याचा धर्म कोणता या गोष्टीने काही फरक पडत नाही. गरज असणाऱ्या व्यक्तीची मदत करण्याचा मी प्रयत्न करत आहे.’

पुढे तो म्हणाला, ‘काही दिवसांपूर्वीच मी एक गरजू व्यक्तीला केन्गेरी येथून व्हाइटफील्ड रुग्णालायचा पोहोचवले. मी पुढचे काही महिने लोकांची मदत करणार आहे. कारण सध्याची परिस्थिती फार बिकट आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 1:03 pm

Web Title: south actor arjun gowda turns ambulance driver for people during covid 19 avb 95
Next Stories
1 फोटो काढायला आलेल्या चाहत्यावर संतापली सारा, जाणून घ्या कारण
2 दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद यांच निधन
3 ‘मारी’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन
Just Now!
X