News Flash

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींवर आहे विजय देवरकोंडाचं क्रश

या दोघीही आघाडीच्या अभिनेत्री आहेत

विजय देवरकोंडा

काही महिन्यांपूर्वी बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. केवळ पाच दिवसांमध्ये १०० कोटींचा गल्ला जमविणारा हा चित्रपट खरं तर तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट त्यावेळीही तितकाच गाजला होता. या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडाने मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर तो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत त्याची प्रसिद्धी झाली. अनेकांच्या हृदयाची धडधड असलेल्या विजयला मात्र बॉलिवूडमधील दोन अभिनेत्री प्रचंड आवडतात. किंबहुना त्या त्याचं क्रश आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

काही दिवसांपूर्वी विजयने ‘फिल्म कम्पॅनियन’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, आयुषमान खुराना, रणवीर सिंग आणि मनोज वायपेयी हे कालाकार मंडळीही उपस्थित होती. यावेळी विजयने त्याला आवडणाऱ्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींची नाव सांगितली.


“तुला आवडणारी अभिनेत्री कोणती?” किंवा “जर कधी एखाद्या वेळी कलाविश्वातील कोणत्याही व्यक्तींचा सल्ला घेण्याची वेळ आली तर कोणाचा सल्ला घेशील?” असा प्रश्न विजयला विचारण्यात आला.यावेळी त्याने क्षणाचाही विलंब न लावता दीपिका पदुकोण आणि आलिया भटचं नाव घेतलं. मात्र आता दीपिकाचं लग्न झालं आहे. त्यामुळे केवळ आलियाचं बाकी असल्याचं त्याने सांगितलं.

दरम्यान, ‘अर्जुन रेड्डी’आणि ‘डियर कॉमरेड’ या तेलुगू चित्रपटांनंतर अभिनेता विजय हा तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूडचेही प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे दिवाने झाले आहेत. ‘डियर कॉमरेड’ या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना ही स्क्रीन शेअर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 12:00 pm

Web Title: south actor vijay deverkonda crush on bollywood actress ssj 93
Next Stories
1 ..म्हणून ‘तान्हाजी’च्या सेटवर देवदत्तला पडलं ‘देवगण नागे’ हे नाव
2 ‘तारक मेहता…’मधील या अभिनेत्रीचा काढता पाय
3 Video : रणबीरला दुखापत नक्की कशामुळे?, चाहते चिंतेत
Just Now!
X