20 November 2017

News Flash

जेवणापेक्षा सेक्सच निवडेन, नागार्जुनच्या सुनेचे बोल्ड वक्तव्य

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने हनिमूनबद्दल वक्तव्य केले होते.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 4:25 PM

संमथा रुथ प्रभू, नागार्जुन

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांच्या विवाहाची चर्चा असतानाच सध्या समंथा तिने केलेल्या एका वक्तव्यासाठी चर्चेत आहे. समंथाने नुकतेच JFW नावाच्या एका मासिकासाठी फोटोशूट केले. यानंतर एका कार्यक्रमादरम्यान तिला काही प्रश्न विचारले गेले असता तिने दिलेल्या एका उत्तरामुळे चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.

सुपरस्टार नागार्जुनची होणारी सून समंथा रुथ प्रभू म्हणाली की ती खाण्याऐवजी सेक्स जास्त पसंत करेल. जेवण आणि सेक्समध्ये तू काय निवडशील, असा प्रश्न तिला विचारला गेला होता. तेव्हा न अडखळता समंथाने उत्तर दिले की, मी जेवणाऐवजी सेक्सला निवडेन. ‘सेक्स एक चांगली आणि नैसर्गिक गोष्ट आहे. यामध्ये चुकीचे असे काही नाही,’ असे ती म्हणाली. समंथाच्या या बोल्ड उत्तरामुळेच सध्या ती चर्चेत आहे. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने हनिमूनबद्दल वक्तव्य केले होते. चैतन्यसोबत ४० दिवसांच्या हनिमूनला जाणार असल्याचे तिने सांगितले होते.

वाचा : सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणावर सल्ला देण्यास करिनाचा नकार

याआधी चित्रपटांमधील बोल्ड अंदाजामुळे समंथा चर्चेत होती. मात्र जेव्हा नागार्जुनच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची बातमी समोर आली, तेव्हा तिची सर्वांत जास्त चर्चा झाली. दोघांचा साखरपुडा झाला असून ६ ऑक्टोबर रोजी ते विवाहबंधनात अडकणार आहेत. गोव्यात हे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ होणार असून तीन दिवस हा विवाहसोहळा रंगणार आहे.

First Published on July 17, 2017 4:25 pm

Web Title: south actress samantha ruth prabhu bold statement said will prefer sex over food