23 September 2020

News Flash

चिरंजीवीचा नवा लूक पाहून चाहते हैराण; कलाकारांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

पाहा, चिरंजीवीचा नवा लूक

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे चिरंजीवी. उत्तम अभिनय शैली आणि अॅक्शन सीन यांच्या जोरावर चिरंजीवीने अफाट लोकप्रियता मिळविली आहे. विशेष म्हणजे चिरंजीवी त्याच्या कामाच्या बाबतीत प्रयोगशील असल्याचं दिसून येतं. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या चित्रपटांमध्ये नव्या अंदाजात किंवा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असतो. यामध्येच त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी एक खास लूक केला आहे. मात्र त्याच्या या लूकमुळे त्या ओळखणं कठीण झाल्याचं दिसून येत आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या चिरंजीवीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने चक्क टक्कल केल्याचं दिसून येत आहे. या फोटोला त्याने साजेशी कॅप्शन दिल्याचं दिसून येत आहे. ‘#UrbanMonk, मी खरंच सन्यासी असल्यासारखा विचार करु शकेन का? , असं तो म्हणाला आहे.चिरंजीवीचा हा नवा लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

#UrbanMonk Can I think like a monk?

A post shared by Chiranjeevi Konidela (@chiranjeevikonidela) on


दरम्यान, चिरंजीवीचा नवा लूक पाहून चाहते हैराण झाल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. यात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांचादेखील समावेश आहे.. राम चरण, वरूण तेज, नागा बाबू, कल्याण देव या सेलिब्रिटींनी देखील चिरंजीवीच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 2:35 pm

Web Title: south indian actor chiranjeevi konidela shared bald photo captioned urban monk ssj 93
Next Stories
1 “साजिद खानने मला विवस्त्र व्हायला सांगितलं”, मॉडेलचा धक्कादायक आरोप
2 सिद्धार्थने खास अंदाजात मितालीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला…
3 …म्हणून दीपिका पदुकोणने घेतला गोव्याला जाण्याचा निर्णय
Just Now!
X