06 December 2019

News Flash

साऊथच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा भाजपात प्रवेश

ग्लॅमरस आणि बोल्ड अंदामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नमिता यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नमिता यांच्यासह अभिनेते राधा रवी यांनीही भाजपात प्रवेश केला. जे.पी नड्डा शनिवारी चेन्नईच्या दौऱ्यावर होते. यावेळी नमिता आणि राधा रवी यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.

अभिनेत्री नमिता यांनी बिल्ला, इंग्लिश करन, जगन मोहिनी यासारख्या चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या आहेत. नमिता यांनी २००१ मध्ये मिस सुरतचे जेतेपद जिंकले, तर मिस इंडियाची उपविजेत्याही त्या राहिल्या. नमिता यांचा दक्षिण भारतात मोठा चाहता वर्ग आहे. कोयंमतूरमध्ये एका चाहत्याने नमिताचे मंदिर उभारले होते. ग्लॅमरस आणि बोल्ड अंदामुळे नमिता या लोकांमध्ये चर्चेत असतात.

अभिनेते राधा रवी याआधी डीएमके पक्षांमध्ये होते. अभिनेत्री नयनताराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं होते. आता राधा रवी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

भाजपानं मिशन दक्षिण अंतर्गत तामिळनाडूमध्ये आपला प्रभाव वाढवायला सुरूवात केली आहे. शनिवारी नड्डा यांनी चेन्नईमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “तुम्ही लोकांनी तमिळनाडूचे भवितव्य बदलण्याचे ठरविले आहे. येत्या काळात भाजपा येथील बळकट राजकीय पक्ष म्हणून उभारी घेईल.”

First Published on December 2, 2019 9:27 am

Web Title: south indian actress namitha joins bjp nck 90
Just Now!
X