26 February 2021

News Flash

प्रदर्शनापूर्वीच रजनीकांत यांच्या ‘काला’ने गाठली ‘ही’ उंची

रजनीकांत स्टारर 'काला'ला सेन्सॉर बोर्डाने १४ कटसह यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे. 'कबाली'चे दिग्दर्शक पीए रंजित यांनीच 'काला'चं दिग्दर्शन केलं आहे.

काला

अभिनय क्षेत्रातून राजकारणात सक्रिय झालेले सुपरस्टार रजनीकांत म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईत जणू. विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत लवकरच काला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर रजनी स्टाईल पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अचानकच कालाच्या चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या खात्यात जमा झालेली कमाई.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘काला’चे सॅटेलाइट राइट्स स्टार नेटव्हर्क्सला तब्बल ७५ कोटींना विकले आहेत. त्यामुळे प्रदर्शनाच्या बाबतीत रजनीकांत यांच्या आगामी काला या चित्रपटाने एक प्रकारची उंचीच गाठली आहे असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाचा एकंदर निर्मिती खर्च आणि तगडी स्टारकास्ट पाहता प्रदर्शनानंतरही ‘काला’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती

‘कबाली’चे दिग्दर्शक पीए रंजित यांनीच ‘काला’चं दिग्दर्शन केलं असून, या चित्रपटात त्यांनी रजनीकांत यांना एका नव्या रुपातून प्रेक्षकांसमोर सादर केलं आहे. ‘काला’मध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी, नाना पाटेकर, अंजली पाटील या मराठमोळ्या कलाकारांचीही वर्णी लागली आहे. या चित्रपटातून तामिळ संस्कृतीचं चित्रण करण्यात येणार असल्याचं असून, चित्रपटाच्या नावावरुन आता बऱ्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. रजनीकांत स्टारर ‘काला’ला सेन्सॉर बोर्डाने १४ कटसह यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 4:11 pm

Web Title: south indian superstar rajinikanths kaala has reportedly earned rs 75 crore even before its release
Next Stories
1 ‘मंकी कपल’ने असा सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस
2 गणवेश हा काही फक्त कापडाचा तुकडा नाही, ‘रुस्तम’मधील त्या पोशाखाच्या लिलावावर ट्विंकल खन्ना ट्रोल
3 रितेशच्या आगामी चित्रपटाचं लय भारी नाव ऐकलं का?
Just Now!
X