साउथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद यांच दु:खद निधन झालं आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय. ते 54 वर्षांचे होते. आनंद यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

पुरस्कारप्राप्त सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरून अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केलाय. मोहनलाल, अल्लू अर्जुन, पृथ्वीराज, संतोष सिवान, धानुष तसचं अभिनेत्री जेनेलिया यांच्या सारख्या अनेक कलाकांनी सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केलंय. क्वारंटाईनमध्ये असलेला अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला, ” सकाळी उठताच के व्ही आनंद सरांच्या निधनाची दु:खद बातमी कळाली. उत्कृष्ट कॅमेरामॅन, हुशार दिग्दर्शक आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. सर तुम्ही कायमच आठवणीत रहाल.रेस्ट इन पीस सर” असं म्हणत अल्लू अर्जुनने त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय.

के व्ही आनंद यांनी फोटो जर्नलिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर के.व्ही. आनंद यांनी दिग्दर्शक पीसी श्रीराम यांच्यासोबच गोपुरा वसलीले, मीरा, देवर मगन यांसारख्या सिनेमासाठी सह-दिग्दर्शन केलं. ‘थेंमाविन कोमांथ’ या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

के व्हि आनंद यांनी तेलगू, तमिळ, मल्याळमसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम केलंय.