News Flash

नागा चैतन्याची बॉलिवूडमध्ये एण्ट्री, आमिरसोबत ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये झळकणार!

सुपरस्टार विजय सेतुपतिच्या जागी केलं कास्ट

सुप्रसिद्ध साउथ स्टार नागा चैतन्या लवकरच बॉलिवूडमध्य़े एण्ट्री करणार आहे. आजवर अनेक साउथ सिनेमांमधून नागा चैतन्यने प्रेक्षकांच्या मनावर जादू केलीय. लोकप्रिय अभिनेत नागार्जुन यांचा मुलगा असूनही त्याने अभिनयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. नागा चैतन्यचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या तो त्याच्या ‘थँक यू’ आणि ‘लव्ह स्टोरी’ या सिनेमांमुळे चर्चेत आहे.

यातच आता नागा चैतन्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत तो झळकणार आहे. एका वृत्तानुसार नागा चैतन्याला ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमासाठी कास्ट करण्यात आलंय. या वृत्तानुसार नागा चैतन्याला लाल सिंह चड्ढा या सिनेमात साउथ इंडयन सुपरस्टार विजय सेतुपति याच्या जागी कास्ट केलं गेलंय. याआधी या सिनेमासाठी विजय सेतुपति याला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र काही कारणास्तव विजयला या सिनेमातून काढून टाकण्यात आलंय आणि त्याजागी नागा चैतन्याला कास्ट करण्यात आलंय.

या सिनेमात नागा चैतन्या आमिरच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. मे महिन्यापासून तो या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात कऱणार आहे. मात्र नागा चैतन्याच्या या बॉलिवूड पदार्पणाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 1994 साली आलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड सिनेमाचा हा रिमेक आहे. त्याचसोबत बाबरी मशीदीच्या विध्वंसाची पार्श्वभूमी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. आमिर खान या सिनेमात एका शीख व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर करीना कपूर त्याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल. अतुल कुलकर्णी यांनी या सिनेमाची कथा लिहली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 3:24 pm

Web Title: south super star naga chitanya in bollywood cast for amir khans lal singh chadha kpw 89
Next Stories
1 ‘डॉक्टर डॉन’मध्ये विक्रांत आणि मोनिकाचा साखरपुडा होणार का?
2 ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री आहे अरूण जेटली यांची भाची
3 ‘येणार म्हटलं तर यायलाच पाहिजे ना’, मुंबईच्या लोकलमध्येही अण्णा नाईकांचा आवाज
Just Now!
X