News Flash

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला करोनाची लागण, सोशल मीडियावर चाहत्यांकडून चिंता व्यक्त

सोशल मीडियावर दिली माहिती

देशात करोनाचा संसर्ग वाढतोय. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेक बॉलिवूड कलाकारांना बसला आहे. गेल्या काही दिवसांत सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना एकमागोमाग एक करोनाची लागण होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. नुकतीच साउथ स्टार पूजा हेगडेला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला करोनाची लागण झाली आहे.

अल्लू अर्जुनने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत करोना झाल्याची माहिती दिली आहे. ” हॅलो एव्हरीवन, माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाईन केलंय. सगळ्यांना विनंती आहे जे माझ्या संपर्कात आले त्यांनी काळजी घ्यावी आणि करोना चाचणी करावी. माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो, त्यांनी काळजी करू नये, मी सर्व खबरदारी घेत उपचार घेत आहे. घरी रहा, सुरक्षित रहा.” असं ट्विट अल्लू अर्जुनने केलंय.

अल्लूची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबियां सोबतच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे . अल्लू अर्जुनचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या ‘अन्ना’ हा ट्रेंड पाहायला मिळतोय.

बॉलिवूडचा भाईजान सलमानने नुकतेच अल्लू अर्जुनचे आभार मानले होते. ‘सिटी मार’ या गाण्यासाठी सलमान खानने ट्विट करत अल्लु अर्जुनला धन्यवाद म्हटलंय. ” ‘सिटी मार’ या गाण्यासाठी धन्यवाद अल्लु अर्जुन…ज्या स्टाईलने तुम्ही या गाण्यात परफॉर्म केलंय, डान्स केलाय, एकंदरीत सगळंच धमाकेदार आहे…काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, लव यू भाई”, असं सलमान खानने या ट्विटमध्ये लिहीलंय.

तर सलमना खानच्या या ट्विटला अल्लु अर्जुनने ही उत्तर दिलंय. त्यात अल्लु अर्जुन म्हणाला, “खूप खूप धन्यवाद सलमान गुरू…तुमच्याकडून झालेलं माझं कौतूक ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा तुमचं प्रेम आहे…राधे फिल्मचं सिटी मार हे गाणं स्कीनवर आपली जादू नक्कीच दाखवेल, ही अपेक्षा…तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप आभार.”असं तो म्हणाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:42 pm

Web Title: south superstar allu arjun tested covid 19 positive fans sad after this news anna trending on social media kpw 89
Next Stories
1 ‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’ ट्रोलरवर भडकली मानसी नाईक
2 प्रियांकाने शेअर केला ‘सिटाडेल’च्या सेटवरून BTS फोटो
3 “प्रियांका चोप्राची बहीण असल्याने मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नाही”, मीरा चोप्राचा खुलासा
Just Now!
X