03 March 2021

News Flash

‘लवकर बरे व्हा’; एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्यासाठी रजनीकांतसह चाहत्यांची प्रार्थना

प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम व्हेंटिलेटरवर

प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी सोशल मीडियावर चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत. केवळ चाहतेच नव्हे तर अनेक दाक्षिणात्य कलाकारांनीदेखील बालसुब्रमण्यम यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचाही समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी बालसुब्रमण्यम यांच्या मुलाने एस. पी. चरण याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. सध्या बालसुब्रमण्म यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजताच दाक्षिणात्य कलाविश्वातील अभिनेता रजनीकांत, दिग्दर्शक भारतीराजा, संगीतकार इलैयाराजा, ए.आर.रहमान, गीतकार वैरामुथु यांनी बालसुब्रमण्यम यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. बालसुब्रमण्यम यांचे चाहते रुग्णालयाबाहेर हातात मेणबत्ती घेऊन उभे आहेत. तर अनेकांनी मंदिरांमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.


दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 9:40 am

Web Title: sp balasubrahmanyam continues to be critical condition and celebrities pray for early recovery of singer ssj 93
Next Stories
1 सोनू सूदने शेअर केली एका दिवसात मदत मागणाऱ्यांची आकडेवारी अन् म्हणाला…
2 सुशांतचं घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना केला होता मेसेज? व्हॉट्सअप चॅट आले समोर
3 ‘स्टारकिड्स स्वप्न दाखवतात आणि नंतर…’, सारा- सुशांतच्या नात्याच्या चर्चांवर कंगनाचे वक्तव्य
Just Now!
X