News Flash

PHOTOS : ‘पद्मावत’च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दीपिकाला मिळाली रणवीरची साथ

त्यांच्या नात्याची सुरेख बाजू पाहायला मिळाली

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग

‘पद्मावत’ या चित्रपटाला कितीही विरोध होत असला तरीही या चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता मात्र तसुभरही कमी झालेली नाही. अवघ्या काही तासांतच प्रेक्षकांच्या भेटी येणाऱ्या या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे नुकते आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भन्साळींच्या या अद्वितीय चित्रपटातील स्टारकास्ट आणि काही खास मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. शाहिद कपूर, मीरा राजपूत, पंकज कपूर आणि खुद्द संजय लीला भन्साळी यांनी या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. पण, या साऱ्यांच्या उपस्थितीत लक्ष वेधलं ते म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने.

रणवीर आणि दीपिका या स्क्रीनिंगसाठी एकत्र आले. मुळात कोणत्याही कार्यक्रमाला एकत्र जाण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. या स्क्रीनिंगसाठी ते आले आणि त्यांनी जिंकलं असंच एकंदर वातावरण पाहायला मिळालं. कारण, बी- टाऊनच्या या बहुचर्चित कपलने एकमेकांचे हात पकडून कशाचीही तमा न बाळगता त्या ठिकाणी प्रवेश केला.

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी दीपिका आणि रणवीरने अगदी साध्या लूकला प्राधान्य दिले होते. यावेळी दीपिकाने पांढऱ्या रंगाचा पायघोळ अनारकली घातला होता. तर, रणवीरने पांढऱ्या रंगाचा लखनवी आणि मोजडी घालत चित्रपटाच्या स्क्रीनिंगला साजेसा पेहराव केला होता. यावेळी दीपिका आणि रणवीर एकमेकांना शोभून दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपविषयीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या सर्व चर्चांकडे दुर्लक्ष करत रणवीर आणि दीपिकाने पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची सुरेख बाजूच सर्वांसमोर आणली असं म्हणायला हरकत नाही.


लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:01 pm

Web Title: special screening of bollywood film padmaavat actor ranveer singh actress deepika padukone holding hands sanjay leela bhansali
Next Stories
1 सोनिया गांधींच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ परदेशी अभिनेत्री
2 Padmaavat Release Updates : ‘पदमावत’चा विरोध टोकाला, जाळपोळ आणि तोडफोडीचे सत्र सुरूच
3 शाहरुख खान म्हणतोय, ‘मी आता ज्येष्ठ नागरिक झालो’
Just Now!
X