बॉलिवूडमध्ये सध्या शाहरुख, सैफ, श्रीदेवी या कलाकारांच्या मुलांच्या चर्चा रंगत आहेत. या सेलिब्रिटी किड्सच्या चित्रपटविश्वात पदार्पणाच्याही बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. सैफ अली खानची मुलगी सारा, श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यांच्यासोबतच आता आणखी एका नावाची यात भर पडली आहे. या सेलिब्रिटी किडकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे नाव म्हणजे सुहाना खान. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान दिग्दर्शक करण जोहरला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेलेली. शाहरुखचा जवळचा मित्र, चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहर तिला लाँच करणार असून यासाठी ती करणच्या ऑफिसमध्ये गेल्याचं म्हटलं जातंय. यासंदर्भातला सुहानाचा एक फोटोसुद्धा सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधतोय. करण जोहरकडून ती अभिनय आणि चित्रपटांविषयी धडेही घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तिचा हा नवीन फोटो या ट्रेनिंग सत्रांमधील आहे की नाही हे अद्याप कळले नाही. मात्र या फोटोमधील तिचं सौंदर्य आणि साधेपणा अनेकांनाच आकर्षित करतोय.

बाबांसोबत एखाद्या कार्यक्रमातील असो किंवा चंकी पांडेचा भाचा आणि जिवलग मित्र अहान पांडेसोबत, सुहानाचे प्रत्येक फोटो सोशल मीडियावर अनेकांना आकर्षित करतात. ग्लॅमर आणि साधेपणा या दोन्ही गोष्टी तिच्या फोटोंमधून दिसून येतात. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच तिचा चाहतावर्ग निर्माण झालाय.

https://www.instagram.com/p/BYa3DoyFupA/

वाचा : बिग बींच्या ट्विटवर नेटीझन्स नाराज

दरम्यान, मुलांच्या शिक्षणाबाबत शाहरुख खूप गंभीर असून बॉलिवूड पदार्पणापूर्वी त्यांनी शिक्षण पूर्ण करावं असा त्याचा आग्रह आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन सध्या परदेशात त्याचं उच्च शिक्षण पूर्ण करतोय.