आजकाल महिलांसोबत गैरवर्तन झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशा घटनांना केवळ सामान्य महिलाच नाही तर अभिनेत्रींना देखील सामोरे जावे लागत आहे. नुकताच एका व्यक्तीने छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती या अभिनेत्रीकडे एकटक पाहात होता. अभिनेत्रीने त्या व्यक्तीला असे का करत आहे विचारताच त्याने अभिनेत्रीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

एम टीव्हीवरील स्प्लिटव्हिला या शोमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री हर्षिता कश्यपसोबत ही घटना घडली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हर्षिता चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर एनआरआय मित्र पालासोबत तिकीट काढण्यासाठी रांगेत उभी होती. त्यावेळी एक व्यक्ती तिच्याकडे एकटक पाहात उभा होता. सुरुवातीला हर्षिताने त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले. नंतर ती व्यक्ती हर्षिताचा पाठलाग करु लागली.

 

View this post on Instagram

 

Motivation de la jounée #greennature#motivated #blessed #harshitakashyap

A post shared by Harshita Kashyap (@harshitak911) on

हर्षिताने त्या व्यक्तीला जाऊन पाठलाग का करत आहे असा प्रश्न विचारला. त्या व्यक्तीने उद्धटपणे मी तुझ्याकडे पाहतोय तर समस्या काय आहे असे उत्तर दिले. त्यानंतर आमच्यात वाद झाला. त्याने माझा मित्र पालावर हात उचलला. मग मी सुद्धा त्या व्यक्तीवर हात उचलला. काही वेळातच रेल्वे पोलिस तेथे आले. त्यांनी आमची मदत केली आणि त्या व्यक्तीला पकडून नेले. या झटापटीमध्ये हर्षिताच्या हाताला दुखापत झाली आहे.

या प्रकरणी २९ वर्षीय शाहरुख शेख नावाच्या व्यक्तीला आम्ही अटक केली आहे. तो वरळीच्या मरियप्पा नगरमध्ये राहणारा असून एका प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये तो काम करत असल्याचे तो म्हणत आहे असे चर्चगेट रेल्वे पोलिसांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले.