News Flash

या अभिनेत्याने केले लिंगबदल, आता ओळखूही शकणार नाही

सुरुवातीला मला अनेक संकटांचा सामना करावा लागला

तुम्हाला ‘स्प्लिट्सव्हिला’च्या ८ व्या पर्वातील गौरव अरोरा आठवतोय का? आता तुम्ही आठवायचा प्रयत्न केला तरी काही फायदा नाही कारण तो जर समोर आला तर तुम्ही त्याला ओळखूही शकणार नाही. कारण दिल्लीचा हा मुलगा आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. त्याने आपले रुप पूर्णपणे बदलले. त्याने लिंग बदल केला असून आता तो गौरी अरोरा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गौरव प्रसारमाध्यमांपासून दूर होता. या काळात त्याने सेक्स चेंज सर्जरी करुन घेतली. या नव्या रुपातले काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले.

सुरूवातीला तो खरे बोलतोय असे कोणाला वाटलेच नाही. पण नंतर हे खरे असल्याचे कळल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. त्याने चाहत्यांना हे फोटो शेअर करत मला या पुढे फक्त गौरी म्हणा असे सांगितले.

आपल्या या बदलाबद्दल सांगताना गौरी म्हणाली की, ‘मी सध्या फार खुश आहे. पण सुरुवातीला मला अनेक संकटांचा सामना करावा लागला. लहानपणी मला मी एक मुलगीच असल्याचे वाटायचे. मी नेहमी पुरूषांकडे आकर्षित व्हायचे. पण समाज या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहिल याची मला जास्त चिंता असायची. मी फुटबॉल खेळायचे तेव्हा मला बाहुल्यांसोबतही खेळायला आवडायचे. तेव्हा लोक मला तृतीयपंथी म्हणून हिणवायचे. जेव्हा माझ्या जवळच्या व्यक्तींना माझ्या लिंगबदलाबद्दल कळले तेव्हापासून त्यांनी माझ्यापासून अंतर ठेवण्यास सुरूवात केली. आम्ही आधी एकत्र जिमला जायचो पण आता ते माझ्यापासून लांबच राहतात.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 5:27 pm

Web Title: splitsvilla season 8 contestant gaurav arora after undergoing a reconstruction surgery comeback on tv again as model
Next Stories
1 ऐन दिवाळीत शाहिदची ‘बत्ती गुल…’
2 ‘नोटाबंदीला समर्थन देऊन मी चूक केली’
3 अखेर सलमान-संजय दत्तमधला दुरावा मिटला?
Just Now!
X