15 December 2019

News Flash

११ ऑगस्टला होणार सर्वांचेच ‘प्रॉब्लेम्स सॉल्व्ह’!

प्रत्येक नातं टिकविण्यासाठी ते वेळोवेळी फुलवतं ठेवावं लागतं.

मला काहीच प्रॉब्लेम नाही

संपूर्ण महाराष्ट्रात २८ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणारा फिल्मी किडा निर्मित, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा आगामी मराठी चित्रपट आता येत्या ११ ऑगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. २८ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या चार हिंदी व दोन मराठी चित्रपटांमुळे प्रेक्षकांना ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ बघताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या चित्रपटाची रिलीज डेट ११ ऑगस्ट करण्यात आलेली आहे.

वाचा : VIDEO ‘गाववाल्यानू तुमचो आमच्यावर भरवसो नाय काय?’ सोनूच्या गाण्याचं मालवणी व्हर्जन

११ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटातून स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले, स्नेहलता वसईकर आणि सतीश आळेकर यांसारखे नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर बेला शेंडे, अभय जोधपूरकर, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि श्रुती आठवले आणि यांच्या आवाजाने सजलेली एकापेक्षा एक गाणी ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. जसराजने संगीत दिग्दर्शनाबरोबरच या चिपटात दोन गाण्यांना आवाजही दिला आहे.

वाचा : PHOTO लातूरच्या मुलीला दत्तक घेत सनी- डॅनिअलने स्वीकारलं पालकत्व

प्रत्येक नातं टिकविण्यासाठी ते वेळोवेळी फुलवतं ठेवावं लागतं. आपल्या आधीची एक पिढी आणि आपली पिढी यांच्या विचारांचा आणि तत्वांचा हा प्रवास समीर विद्वांस दिग्दर्शित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाद्वारे येत्या ११ ऑगस्टला आपणास पाहायला मिळणार आहे.

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाची निर्मिती पी.एस. छतवाल, रिचा सिन्हा आणि रवि सिंग यांनी केली आहे.

First Published on July 21, 2017 12:40 pm

Web Title: spruha joshi gashmeer mahajani mala kahich problem nahi will release on 11 august
Just Now!
X