News Flash

राणा डग्गुबतीच्या भावाने आपला वापर केल्याचा टॉपलेस होणाऱ्या अभिनेत्रीचा दावा

 श्री रेड्डीने काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या समोरील रस्त्यावर टॉपलेस होत सर्वांनाच धक्का दिला होता.

श्री रेड्डी

चित्रपटसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काऊच विरोधात आवाज उठवत भर रस्त्यात टॉपलेस होणाऱ्या अभिनेत्री श्री रेड्डीचीच चर्चा सध्या सुरु आहे. दर दिवसाआड तिच्याविषयीच्या काही गोष्टींचा खुलासा होतोय. माध्यमांमध्येही तिच्याच मुलाखतींच्या माध्यमातून काही गोष्टींचा गौप्यस्फोट होत असून, त्याद्वारे काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे. ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत श्री रेड्डीने निर्माते सुरेश बाबू यांच्या मुलाने आपला वापर केल्याचा गौप्यस्फोट केला.

‘सुरेश बाबू यांच्या मुलाने माझी फसवणूक केली आहे. तो स्टुडिओ सरकारचा असून, होतकरु कलाकारांची मदत व्हावी या उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे त्या स्टुडिओचा नीट वारप होणंसुद्धा अपेक्षित आहे. पण, सुरेश बाबूच्या मुलाने मला त्यांच्या स्टुडिओमध्ये नेले आणि माझ्यावर अत्याचार केले’, असं तिने या मुलाखतीत सांगितलं. सुरेश बाबू आणि त्यांच्या मुलाचं नाव असं अचानक प्रकाशझोतात आलं असून, आता या सर्व प्रकरणात अप्रत्यक्षरित्या राणा डग्गुबतीच्या नावाचाही समावेश झाला आहे. प्रसिद्ध निर्माते सुरेश बाबू हे राणाचे वडील असून, श्री रेड्डीवर अत्याचार केलेला अभिराम हा त्याचा भाऊ आहे.

वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र

सुरुवातीला श्री रेड्डीने आपल्यावर अत्याचार करणाऱ्या इसमाचं नाव सांगितलं नव्हतं. पण, त्यानंतर तेलुगू वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिरामनेच आपला वापर केल्याचा खुलासा तिने केला. याच मुलाखतीदरम्यान तिचे आणि अभिरामचे काही फोटोसुद्धा दाखवण्यात आले. हा सुरेश बाबूंचा मुलगा अभिराम असून, याआधी मी त्याच्या नावाची वाच्यताही केली नव्हती. असं म्हणत तिने पुरावा म्हणून हे फोटो सर्वांना दाखवले आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली. सोशल मीडियावर राणाच्या भावाचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चांना तोडं फुटलं आहे. श्री रेड्डीने काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या समोरील रस्त्यावर टॉपलेस होत सर्वांनाच धक्का दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 10:33 am

Web Title: sri reddy claims south indian actor rana daggubatis brother abhiram used her leaks pics
Next Stories
1 फ्लॅशबॅक : ‘मिस्टर बॉण्ड’ अक्षय कुमार…
2 Top 10: सोनाक्षी सिन्हाच्या ट्रोलिंगपासून इरफान खानच्या आजारपणापर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर
3 ‘मसान’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात
Just Now!
X