News Flash

श्री श्री रवीशंकर पडले ‘पद्मावत’च्या प्रेमात

लोकांना या सिनेमाचा गर्व वाटला पाहिजे

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरयाणा या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनावर असलेल्या बंदीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असली तरी अजूनही अनेक ठिकाणी या सिनेमाला विरोध केला जात आहे. करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले की, ”पद्मावत’ सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित झाला तर तेव्हा ‘जनता कर्फ्यू’ लावू. कोणाला हा सिनेमा पाहायला असेल तरी त्यांनी पाहू नये. उद्या मुंबईत या सिनेमाबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे.’ या सर्व वादादरम्यान, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना ‘पद्मावत’ सिनेमा दाखवला.

भन्साळी यांनी बंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर’मध्ये सोमवारी रविशंकर यांच्यासाठी ‘पद्मावत’ सिनेमाचे खास स्क्रिनिंग ठेवले होते. रविशंकर यांनी हा सिनेमा पाहून सिनेमाचे भरभरून कौतुक केले. ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रविशंकर यांना दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांचा अभिनय फार आवडला. ते म्हणाले की, ‘मला कळत नाही की या सिनेमाचा विरोध का केला जात आहे. या सिनेमात राजपुतांच्या सन्मानाचीच कथा सांगण्यात आली आहे. राणी पद्मावतीला देण्यात आलेली ही अनोखी आदरांजली आहे.’

लोकांना या सिनेमाचा गर्व वाटला पाहिजे, असे रविशंकर म्हणाले. २५ तारखेला हा सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सर्व राज्यांची आहे आणि चित्रपट स्क्रिनिंगदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. सिनेमात नावापासून अनेक बदल करण्यात आलेले असून परीनिरीक्षण मंडळाने सुचवलेले बदलही केले आहेत. यानंतरही राज्य सरकारांना या सिनेमावर बंदी घालण्याचा अधिकार कसा काय असू शकतो, असा सवाल निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 7:06 pm

Web Title: sri sri ravi shankar watches padmaavat with bhansali says its a beautiful tribute
Next Stories
1 रवी जाधवच्या न्यूडला सेन्सॉरकडून ‘अ’ प्रमाणपत्र, एकही कट नाही
2 अल्ता लावून कतरिना पार्टीला जाते तेव्हा..
3 आयआयएममध्ये ‘बाहुबली- २’ ची केस स्टडी
Just Now!
X