News Flash

‘मिस्टर इंडिया’च्या सिक्वलमध्ये दिसणार या सेलिब्रिटी मायलेकी?

रवी उद्यावार करणार चित्रपटाचं दिग्दर्शन

श्रीदेवी, जान्हवी कपूर

स्टार किड्सच्या बॉलिवूड पदार्पणाच्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळतात. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान एकीकडे ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असतानाच, दुसरीकडे अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या पदार्पणाचीही चर्चा सुरू आहे. पदार्पणापूर्वीच जान्हवीचा एक चाहतावर्ग निर्माण झाला असून, तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आईच्याच गाजलेल्या चित्रपटात ती भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. श्रीदेवीच्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाच्या सिक्वलमधून ती पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विशेष म्हणजे या सिक्वलमध्ये श्रीदेवीसुद्धा अभिनय करणार आहे. ‘मिस्टर इंडिया’मधील जोडी म्हणजेच श्रीदेवी आणि अनिल कपूरसोबत दुसरी जोडी निर्मात्यांना पडद्यावर दाखवायची आहे. यात जान्हवी नायिकेच्या भूमिकेत झळकेल. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ बॉक्स ऑफीसवर प्रचंड गाजला होता. चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. रवी उद्यावार या सिक्वलचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिग्दर्शक रवी उद्यावार यांचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मॉम’ या चित्रपटात श्रीदेवीने अभिनय केला होता.

वाचा : वरूण- नताशाचा ब्रेकअप?

नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून जान्हवी पदार्पण करणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती. मात्र, अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. करण जोहर यासंदर्भात कोणतीही पक्की माहिती देत नसल्यानेच कदाचित श्रीदेवीने स्वत: जान्हवीच्या पदार्पणाची जबाबदारी स्वीकारली असावी. ‘मिस्टर इंडिया’च्या सिक्वलच्या माध्यमातून या मायलेकीला एकत्र रुपेरी पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2017 5:12 pm

Web Title: sridevi and daughter jhanvi kapoor to share screen space in mr india sequel
Next Stories
1 अखेर चुलत बहिण राणीला भेटायला गेली काजोल!
2 लवकरच अनिल-माधुरी चाहत्यांची ‘धकधक’ वाढवणार?
3 वरूण- नताशाचा ब्रेकअप?
Just Now!
X