News Flash

…जेव्हा श्रीदेवीची मुलगी डान्स ऑडिशन देते

कोरिओग्राफर रेमो डिसोझासमोर खुशीने दिलं ऑडिशन

khushi kapoor, sridevi, dance plus
खुशी कपूरने दिलं 'डान्स प्लस'साठी ऑडीशन

एकीकडे अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा असताना आता दुसरीकडे तिची धाकटी मुलगी खुशी कपूर तिच्या करिअरसाठी महत्त्वाचे पाऊल उचलताना दिसतेय. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे जान्हवीने आधीच स्पष्ट केले असताना खुशी नेमके काय करेल हे कोणालाच माहित नव्हते. आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे खुशीसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असेच अनेकांना वाटत होते. मात्र आपल्याला नृत्यकलेत आवड असल्याचे खुशी कपूरने स्पष्ट केले असून एका डान्स रिअॅलिटी शोसाठी तिने ऑडिशनदेखील दिले आहे.

स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शोसाठी खुशी कपूरने ऑडिशन दिले आहेत. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसोझा यामध्ये परिक्षक असून ‘डान्स प्लस’चे हे तिसरे पर्व आहे. मोठी बहिण जान्हवी कपूरप्रमाणे खुशीची माध्यमांमध्ये फार चर्चा झाली नाही. त्यामुळे जेव्हा ती ऑडिशन देण्यासाठी आली तेव्हाही तिला कोणी ओळखले नाही. खुशी माध्यमांसमोर क्वचितच झळकली असल्याने श्रीदेवीची मुलगी असल्याचे कोणाला कळलेच नाही. मात्र टॉप ३५ मध्ये आल्यानंतर रेमोसमोर डान्स करायला जेव्हा खुशी आली, तेव्हा ती श्रीदेवीची मुलगी असल्याचे कळाले. त्यामुळे घराणेशाहीचा आणि आपल्या आईच्या नावाचा वापर न करता आपल्यातील कौशल्याने खुशीला ऑडिशनमध्ये जिंकायचे होते हे यातून स्पष्ट होत आहे.

VIDEO : इंदू सरकारमधील ‘ही’ फेमस कव्वाली नक्की पाहा!

खुशी कपूर या ऑडिशनमध्ये जिंकू शकली की नाही हे अद्याप कळाले नसले तरी तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतीलच. आपल्या दिलखेचक अदा आणि नृत्यकौशल्याने श्रीदेवी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करते. तिचे हेच गुण खुशीमध्येही पाहायला मिळतील का, याची अनेकांना उत्सुकता आहे. तर दुसरीकडे जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून ‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून झळकणार आहे. याची निर्मिती करण जोहर करणार असल्यामुळे अनेकांच्या नजरा या आगामी चित्रपटाकडे लागल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2017 7:21 pm

Web Title: sridevi daughter khushi kapoor gave auditions for remo dsouza dance plus show
Next Stories
1 कलेचा वारसा पुढे नेणारी पिढी घडवण्यासाठी मिलिंद शिंदेंचा पुढाकार
2 एका मराठी सिनेमासाठी दगडू काय करतोय हे बघा तरी
3 VIDEO : इंदू सरकारमधील ‘ही’ फेमस कव्वाली नक्की पाहा!
Just Now!
X