27 November 2020

News Flash

श्रीदेवीने केली ओठांची सर्जरी?

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

श्रीदेवी

अभिनेत्री श्रीदेवीने दिग्दर्शक अनुराग बासूने आयोजित केलेल्या सरस्वती पूजेला हजेरी लावली. पण यावेळी श्रीदेवीच्या चेहऱ्यात बदल जाणवत होता. या कार्यक्रमातील तिचे व्हायरल झालेले फोटो पाहून अनेकांनी तिने ओठांची सर्जरी केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तिची सर्जरी व्यवस्थित झाली नसल्याची प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिली आहे.

कार्यक्रमात श्रीदेवीने पती बोनी कपूरसह हजेरी लावली होती. यावेळी ती गॉगल आणि कॅज्युअल लूकमध्ये दिसली. पण तिच्या बदललेल्या ओठांच्या आकारावर सगळ्यांच्या नजरा जात होत्या. तिने लिप सर्जरी केल्याचे म्हटले जात आहे. याबाबत तिला प्रश्नही विचारण्यात आला. ‘मी कोणतीही सर्जरी केली नाही. मी आरोग्यदायी आयुष्य जगते आणि पॉवर योगा करते. शिवाय समतोल आहारसुद्धा घेते. आठवड्यातून चार दिवस टेनिस खेळते. जंक फूड खाण्याचे टाळते. या सर्व गोष्टींमुळे चेहऱ्यात बदल जाणवतच असतो,’ असे उपरोधिक उत्तर तिने दिले.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

बॉलिवूडमध्ये सध्या सर्जरीची क्रेझ अतिशय वाढली असून यापूर्वी इशा गुप्तानेही ओठांची सर्जरी केल्याचे म्हटले जात होते. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये तिच्या ओठांचा आकार बदललेला नेटकऱ्यांना जाणवला. त्यावेळी अनेकांनी तिच्या बदललेल्या लूकवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता श्रीदेवीबाबतही सोशल मीडियावर तशीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 7:52 pm

Web Title: sridevi latest pics creating buzz about her lip surgery
Next Stories
1 अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले
2 ..तर रणवीर करणार ‘जोहर’- ऋषी कपूर
3 ‘या’ चित्रपटात पाच लूकमध्ये दिसणार सलमान
Just Now!
X