News Flash

PHOTO: ‘फर्स्ट लेडी ऑफ बॉलिवूड’सह किंग खान फोटोसाठी पोझ देतो तेव्हा..

किंग खान आणि गौरी खान ही बॉलिवूड वर्तुळातील एक प्रसिद्ध आणि सर्वांच्याच आवडीची जोडी आहे

छाया सौजन्य- शी कॅनडा / मासिक

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख, त्याची पत्नी गौरी आणि त्याची मुलं आर्यन, सुहाना, अब्राम हे एकाच फोटो फ्रेममध्ये दिसणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो समोर आला होता. त्यावेळी किंग खानच्या या ‘फॅमिली नं. १’चा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. अशा या रईस कलाकाराच्या कुटुंबाचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. एका मासिकाच्या कव्हरपेजवर शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे.

‘शी कॅनडा’ या मासिकाच्या फेब्रुवारी महिन्यातील आवृत्तीच्या कव्हरपेजवर किंग खानच्या कुटुंबाची शान पाहायला मिळत आहे. सोफेस्टिकेटेड फॉर्मल्स परिधान केलेले हे खान कुटुंबिय एकमेकांना अगदी शोभून दिसत आहेत. इथे लक्ष देण्याची बाब म्हणजे या मासिकाच्या मुखपृष्ठावर गौरी खानच्या नावाचा उल्लेख ‘द फर्स्ट लेडी ऑफ बॉलिवूड’ असा करण्यात आला आहे. किंग खान आणि त्याची पत्नी गौरी खान ही बॉलिवूड वर्तुळातील एक प्रसिद्ध आणि सर्वांच्याच आवडीची जोडी आहे. त्यामुळे गौरी खानला ‘फर्स्ट लेडी ऑफ बॉलिवूड’, म्हणूनही ओळखले जाते.

shecanada_srkfam

कुटुंब आणि नात्यांचा विषय येतो तेव्हा शाहरुख हा अनेकांसाठीच प्रेरणास्थान ठरतो. या सुपरस्टारने त्याचे काम, कुटुंब आणि चाहते यांच्यात योग्य तो समतोल साधला आहे. शाहरुख हा गौरीवरचे त्याचे प्रेम नेहमीच व्यक्त करतो. तसेच, सोशल मिडीयाच्या माध्यमातून तो एक चांगला पिता असल्याचेही दिसून येते. आपल्या मुलांसोबतचे फोटो किंवा त्यांच्याविषयी काही ना काही तो सोशल मिडीयावर शेअर करत असतो. इतकेच नाही तर मुलाखतींमध्येही तो आपल्या मुलांविषयी बोलल्यावाचून राहत नाही. अब्राम तर बहुतेकदा त्याच्या वडिलांसह म्हणजे शाहरुखसोबतच दिसत असतो. त्यात यावर्षीचा प्रजासत्ताक दिन विसरून कसे चालेल. त्या दिवशी शाहरुखने त्याच्या मुलांनी केलेले सुंदर कलाकुसर चाहत्यांसोबत शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याची दोन मुले आर्यन आणि सुहाना आता मोठी झाली असून शाहरुखही अभिमानाने त्यांनी केलेल्या यशस्वी कामाबद्दल सांगत असतो.

याआधी, गौरी आणि शाहरुखच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष्य वेधले होते. मात्र, यावेळेस त्याच्या तिनही मुलांवरून सर्वांच्या नजरा हटत नसल्याचे चित्र आहे. हा फोटो पाहता सुहाना आणि आर्यन बॉलीवूड चित्रपटसृष्टीत येण्यास जास्त दिवस लागणार नाहीत अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 8:54 am

Web Title: srk gauris family portrait with kids aryan suhana and abram for a magazine cover
Next Stories
1 कथा पोलिसांच्या शोधाची आणि हुशारीची
2 सेलेब्रिटी लेखक : आजोबांच्या कास्टिंगमुळे श्रीगणेशा!
3 ‘जर्नी प्रेमाची’
Just Now!
X