04 March 2021

News Flash

‘भल्लालदेव’च्या क्रोधाग्नीचा दाह..

एखादे भक्ष गिळंकृत करण्यासाठी आतुर असलेला राणा

‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता प्रभास जितका चर्चेत आला तितकाच राणा डग्गुबतीही प्रकाशझोतात आला आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने आणि खुद्द राणाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ‘भल्लालदेव’ची झलक असणारा पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये राणा साकारत असलेला ‘भल्लालदेव’ सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे. या पोस्टरमध्ये राणाची पिळदार शरीरयष्टी पाहायला मिळत असून, त्याच्या चेहऱ्यावर भयंकर राग दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर सूडाची भावना झळकत आहेत.

या पोस्टरमध्ये राणा साकारत असलेल्या ‘भल्लालदेव’च्या मागे तीन सिंह पाहायला मिळत आहेत. त्यासोबत हात रुंदावलेला आणि एखादे भक्ष गिळंकृत करण्यासाठी आतुर असलेला राणा पक्का खलनायक दिसतो आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २- द कन्क्लूजन’ या चित्रपटातून भव्य कथानकाला साद घालण्यात येणार आहे. प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. याच उत्सुकतेला आणखी ताणून धरण्यासाठी चित्रपटाशी संलग्न काही गोष्टींचा उलगडा करण्यास सुरुवात झाली असून, त्याचा चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये चांगलाच हातभार लागत आहे.

‘बाहुबली द बिगिनिंग’चा सिक्वल असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. एस. राजामौली यांनी केले असून, साबू सिरिलने चित्रपटाचे कला दिग्दर्शन केले आहे. भव्यतेची अनुभूती देत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली बाहुबलीची कथा ‘बाहुबली २-द कन्क्लूजन’ या चित्रपटातून पूर्णत्वास जाणार आहे. २८ एप्रिलला प्रदर्शित होणारा हा चित्रपट तेलगु, हिंदी, तमिळ, मल्ल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, प्रभास, राणा डग्गुबती, सत्यराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले..?’ या प्रश्नाचे उत्तर देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 3:45 pm

Web Title: ss rajamouli directed baahubali 2 the conclusion rana daggubati shares his fierce look negative role
Next Stories
1 रजनीकांतचा ‘रोबोट २.०’ हा ‘मेक इन इंडिया’ सिनेमा
2 शाहरुख-अनुष्काचे ‘ते’ फोटो होताहेत व्हायरल!
3 सगळ्या वादातून दूर जात कपिलनं धरली ‘वन’वाट
Just Now!
X