News Flash

Baahubali 2 new trailer : ‘भल्लालदेव’-‘शिवुडू’मधील युद्ध पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स ठरत आहेत जमेची बाजू

बाहुबली २

विविध चित्रपटांचे विक्रम मोडित काढत दिग्दर्शत एस.एस. राजामौली यांचा ‘बाहुबली २’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवलं असून तब्बल १००० कोटींची कमाई केली आहे. याच निमित्ताने ‘बाहुबली २’च्या टीमने एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील काही गाजलेले संवाद आणि दृश्यांचं सुरेख संकलन करण्यात आलं आहे. अवघ्या ३० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मुख्य आकर्षणाची गोष्ट ठरत आहे ती म्हणजे अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबती यांच्यातील रक्तरंजित युद्ध.

३० सेकंदांच्या या थरारक व्हिडिओमध्ये भल्लालदेव (राणा डग्गुबती) आणि शिवुडू (प्रभास) यांच्यातलं युद्ध पाहताना प्रेक्षकांचंही भान हरपत आहे. ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं…?’ या एका प्रश्नाच्या उत्तरापोटी राजामौलींनी इतक्या भव्य चित्रपटाची निर्मिती केली ही प्रशंसनीय बाब आहे. प्रभास, राणा डग्गुबती, सत्यराज, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया आणि रम्या कृष्णन याच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने अपेक्षेपेक्षाही जास्त यश संपादन केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

वाचा: अजून कोणता रेकॉर्ड मोडायचा बाकी राहिलाय का?

मुख्य म्हणजे या चित्रपटात साकारण्यात आलेली दृश्य आणि चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्सही भारतीय चित्रपटसृष्टीतील एका समृद्ध काळाची प्रचिती देत आहेत. चित्रपटातील पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये असणारी उत्सुकता, कुतूहल आणि त्या ठराविक पात्राकडून प्रेक्षकांची अपेक्षा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भल्लालदेव आणि शिवुडू यांच्यातील दृश्यांची आखणी करण्यात आली होती, असं राजामौलींनी स्पष्ट केलं होतं. ‘बाहुबली २’ मधील भल्लालदेव आणि शिवुडूमधील या दृश्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते फाइट कोरिओग्राफर पीटर हेइन यांनीही बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 8:01 pm

Web Title: ss rajamoulis baahubali 2 new trailer shivudu and bhallaladeva face off watch video
Next Stories
1 सोशल मीडियावर व्हायरल होतोय तैमुरचा ‘हा’ निरागस फोटो
2 PHOTOS: ‘क्वीन’ कंगनाचा राजमहाल पाहिलात का?
3 वायूदलाच्या ‘त्या’ ऑपरेशनवर लवकरच चित्रपट; शाहरुख साकारणार लीड रोल?
Just Now!
X