News Flash

रजनीकांतच्या चाहत्यांसाठी ‘कबाली’चा स्टार गोल्डवर प्रिमियर

#KabaliOnStarGold हा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये आणला आहे.

कबाली

हिंदी चित्रपट दाखविणारी वाहिनी स्टार गोल्ड ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ चित्रपटाचा प्रिमियर दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. यावर्षीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘कबाली’ चित्रपट होता. या चित्रपटाची विविध शक्कल लढवून प्रसिद्धीही करण्यात आली होती. येत्या रविवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला ‘कबाली’ चित्रपट तुम्हाला स्टार गोल्ड वाहिनीवर पाहता येणार आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांनी #KabaliOnStarGold हा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये आणला आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कबाली’ हा चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला घेऊन रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच थिएटर्सच्या बाहेर तिकीटांसाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर काही ठिकाणी ऑफिसमध्येही सुट्टी देण्यात आली होती. तर एका ऑफिसने पीव्हीआरसोबत टायअप करुन आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत तिकीटही दिली होती. या चित्रपटात रजनीकांत यांना तरुण आणि वृद्ध अशा दोन रुपात दाखवण्यात आले आहे. रजनीकांत यांचा तरुणपणीचा लूक त्यांच्या फॅन्सना फारच आवडलेला. चित्रपटात रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने साकारली आहे. ७५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या १३ दिवसांमध्येच ३५० कोटींची कमाई केली होती.

दरम्यान, तंत्रज्ञानाच्या जोरावर चित्रपटाचा पुरेपुर आनंद घेण्याची संधी काही नेत्रहिनांनी मिळाली होती. हा चमत्कार चेन्नईत घडला होता. रजनीकांत यांचा अभिनय असलेल्या ‘कबाली’ या सुपरहिट चित्रपटाचा आनंद त्यांनी लुटला. “रजनीकांत यांनी आपला सूट परिधान केला असून, आपल्या अनोख्या शैलीत ते तुरुंगाबाहेर आले आहेत.” हे वाक्य ‘डिस्क्रिप्टिव्ह ऑडिओ टेक्नॉलॉजी’ने सज्ज असलेल्या चित्रपटगृहात गुंजताच उपस्थित सर्व नेत्रहिन प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत एकच जल्लोष त्यावेळी केलेला. तेव्हा सातशेहून अधिक नेत्रहिनांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रपटाचा आनंद लुटलेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 7:45 pm

Web Title: star gold %e2%80%8bto premiere rajnikanths kabali on 20 november
Next Stories
1 VIDEO: अशा रितीने आमिर खान बनला ‘हानिकारक बापू’
2 नोटाबंदीचा स्वप्नील-सुबोधच्या ‘फुगे’ला प्रदर्शनापूर्वीच फटका
3 प्रेमभंगाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी आलिया जाणार सुट्टीवर
Just Now!
X