तैमूर हा सध्या सर्वात लोकप्रिय असणारा स्टार कीड आहे. त्याच्या क्यूटनेसमुळे तो कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असल्याचे दिसते. कधी आई करिना कपूरसोबत तर कधी वडिल सैफ अली खानसोबत तो आपल्याला दिसतो. नुकताच त्याचा एयरपोर्टवरील एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये तैमूर अतिशय कूल लूकमध्ये दिसत आहे. मागील काही दिवसांपासून करिनासोबत परदेशात असलेला हा छोटा नवाब नुकताच भारतात परतला. त्यावेळी त्याने मरुन रंगाचा ट्रॅकसूट आणि पांढऱ्या रंगाचे स्पोर्टशूज घातल्याचे दिसत आहे. यामध्ये तो अतिशय कूल आणि गोंडस दिसत आहे. त्याच्या गोऱ्या रंगावर हा मरुन रंग अतिशय उठून दिसत आहे.

तर करिनाही काळ्या रंगाची पँट, टॉप आणि त्यावर चॉकलेटी रंगाच्या हाफ जॅकेटमध्ये एकदम स्टायलिश दिसत आहे. यावर तिने कूल असा गॉगल आणि शूज घातले आहेत. करिनाचा हात धरुन अतिशय शांतपणे तैमूर एयरपोर्टवरुन चालताना या व्हिडियोमध्ये दिसत आहे. यावेळी आजुबाजूनी अनेक लोक त्याचे फोटो काढत असल्याचेही समजत आहे. तैमुर आपल्या आई-बाबांसोबत ‘न्यू इयर सेलिब्रेशन’साठी पॅरीसला गेला होता. त्यावेळचे त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर त्याआधी करिना-सैफने तैमुरचा वाढदिवस स्वित्झर्लंडमध्ये साजरा केला होता. तिथूनच ते पॅरीसला रवाना झाले होते. पॅरिसच्या बर्फाळ प्रदेशात मस्ती करणाऱ्या तैमुरचे काही फोटो इंस्टाग्रामवर पाहायला मिळाले होते.