26 September 2020

News Flash

VIDEO : ..म्हणून सेलिब्रिटी रंगले विठू नामाच्या गजरात

या सेलिब्रेटींनी एकत्र येऊन केलेल्या विठुमाऊलीच्या आरतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

'विठूमाऊली' ही नवी मालिका स्टार प्रवाह लवकरच सुरु होणार आहे.

सध्या घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले आहेत. घरचे सर्व एकत्र येऊन बाप्पांची उत्साहाने आरती करत आहेत. स्टार प्रवाह परिवारातील सेलिब्रेटी सदस्यांनी एकत्र येऊन नुकतीच एक आरती नव्या ढंगात सादर केली. या सेलिब्रेटींनी एकत्र येऊन केलेल्या विठुमाऊलीच्या आरतीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निमित्त आहे आगामी ‘विठुमाऊली’ या नव्या मालिकेचं!

‘विठूमाऊली’ ही नवी मालिका स्टार प्रवाह लवकरच सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहिनीतर्फे नुकताच विठुमाऊलीच्या आरतीचा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करण्यात आला. यात समीर परांजपे, रुपल नंद, उपेंद्र लिमये, प्रसिद्धी किशोर, हर्षदा खानविलकर, सुपर्णा श्याम, संकेत पाठक, नेहा पवार, रश्मी अनपट, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सायली देवधर, प्रसाद जवादे, संग्राम साळवी या कलाकारांनी एकत्र येत विठूमाऊलीची आरती केली आहे. कोठारे व्हिजनचे महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे याचा सुद्धा यात सहभाग होता.

वाचा : माहेरचा गणपती ‘हातावरील टॅटूमुळे तो नेहमीच माझ्या सोबत असतो’

‘येई हो विठ्ठले माझे माऊली ये’ ही पारंपरिक आरती नव्या ढंगात सादर करण्यात आली आहे. संगीतकार सुयोग चुरी यांनी ही आरती संगीतबद्ध केली आहे. राजेश बिडवे यांनी नृत्यदिग्दर्शन, विनायक जाधव यांनी छायांकन, आलाप मोहिले यांनी सह दिग्दर्शन आणि शिल्पेश कोठारे यांनी दिग्दर्शन केलं आहे. गौरव बुरसे, करण कागळे, पल्लवी केळकर आणि मीरा भालेराव यांना ही आरती गायली आहे.

वाचा : जाणून घ्या, अजयच्या ‘बादशाहो’ची पहिल्या दिवसाची कमाई

सध्या ही आरती घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गाजत आहे. सोशल मीडियावर ही आरती पोस्ट केल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत या व्हिडिओला ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अवघ्या महाराष्ट्रात ‘विठुमाऊली’ या मालिकेविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं या प्रतिसादावरून दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 4:50 pm

Web Title: star pravah celebrities new promo song for vithumauli serial
Next Stories
1 ‘प्रसिद्धीसाठी हृतिकच्या नावाची गरज नाही’
2 ‘अरे, मी जिवंत आहे’
3 VIDEO : काळवीट शिकार प्रकरणी चौकशीदरम्यानचा सलमानचा हा व्हिडिओ पाहिला का?
Just Now!
X