22 September 2020

News Flash

स्त्रियांच्या शोषणाविरोधात सरसावल्या ‘स्टार प्रवाह’च्या नायिका

'असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..'

कोणाचंही कुठल्याही प्रकारे शोषण होणं अयोग्यच… अनेकदा जवळच्याच, ओळखीच्याच व्यक्तींकडून असे प्रकार घडतात. त्यावेळी काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शोषणाविरोधात न घाबरता, धैर्यानं आवाज उठवलाच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा दिलीच पाहिजे. स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील नेहा आता शोषणाविरोधात खंबीरपणे आवाज उठवणार आहे. तिच्या प्रयत्नांना यश मिळतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या कथानकात वेगळंच वळण आलं आहे. स्वत: डॉक्टर असलेल्या नेहाचं तिच्या नणंदेच्या पतीकडून, संजयकडून शोषण होत आहे. मात्र, आता नेहाचा संयम संपला आहे. तिनं धीरानं उभं रहायचं ठरवलं आहे. शोषणाविरोधात आवाज उठवण्याचा तिनं निर्णय घेतला आहे. शोषणाविरोधात उभं राहण्याविषयी नेहाची भूमिका साकारणारी नुपूर परूळेकर म्हणाली, “अन्याय निमूटपणे सहन करू नका. त्याच्याविरोधात आवाज उठवा, अपराध करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. नेहानं तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड पुकारलाय, तिच्या लढ्यात तुमचीही साथ असू द्या.”

शोषणाविरोधात आवाज उठवण्याच्या नेहाच्या निर्णयाला स्टार प्रवाह परिवारातील बाकी नायिकांनीही पाठिंबा दिला आहे. “कुठल्याही अन्यायाला सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे. स्त्री कोणत्याही संकटावर मात करू शकते. त्यामुळे अन्याय झाला तर तो सहन न करता हाणूनच पाडला पाहिजे. त्यासाठी मला एका कवितेच्या ओळी आठवतात त्या अशा, ‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..’ असं ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेतली मीरा, अर्थात सायली देवधर म्हणाली. तर ‘गोठ’ची नायिका राधा, म्हणजे रुपल नंद म्हणते, “एरवी इतरांसाठी जगणारी तू, आज एकदा स्वतःसाठी काहीतरी कर.”

“स्त्री हा किती साधा शब्द आहे नाही?…जन्म तिनेच द्यायचा, यातनाही तिनेच सहन करायच्या, पुरुषाच्या सुखात तिनं सहभागी व्हायचं; पण तिच्या यातना कोण बरं सहन करू शकेल? दुसऱ्याच्या घरातील मुली किंवा स्त्रिया यांना उपभोग्य वस्तू समजणाऱ्या नराधमांना समज देण्याची वेळ आता आली आहे आणि हे काम आपण स्त्रियांनीच करायचं आहे. आपण खंबीर व्हायचं आहे,” अशा शब्दांत ‘शतदा प्रेम करावे’च्या सायलीनं, ज्ञानदा रामतीर्थकरनं नेहाला पाठिंबा दिला आहे.

‘छोटी मालकीण’ ऐतशा संझगिरीनं सांगितलं, “प्रत्येक स्त्रीला स्पर्श कुठल्या हेतूनं केला आहे हे ओळखता येतं. जेव्हा पहिल्यांदा त्या स्पर्शाबाबत काहीतरी विचित्र जाणवतं, तेव्हाच स्त्रीनं प्रतिकार करायला हवा” आता आपल्याबरोबर होणाऱ्या शोषणाविरोधात नेहा कशा पद्धतीनं उभी राहते हे जाणून घेण्यासाठी न चुकता पाहा ‘नकळत सारे घडले’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 5:44 pm

Web Title: star pravah marathi serial nakalat sare ghadle new track
Next Stories
1 वैभव तत्ववादीला दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
2 आता ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो
3 अखेर ‘आर्यनमॅन’ अडकला लग्नाच्या बेडीत
Just Now!
X